शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भारत-इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची ब्लॅक मार्केटिंग, दोन आरोपींना रंगेहाथ पकडले

By योगेश पांडे | Updated: February 4, 2025 23:33 IST

व्हीसीएचे तोतया कर्मचारी असल्याची बतावणी; ज्येष्ठ नागरिकाचादेखील समावेश

नागपूर : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या तिकिटांचा सोशल माध्यमांवर काळाबाजार सुरू असताना पोलिसांनी सदर येथील व्हीसीए मैदानाजवळूनच दोघांना ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे कर्मचारी असल्याची बतावणी करून काळाबाजार करत होते. आरोपींमध्ये ज्येष्ठ नागरिकाचादेखील समावेश आहे. सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.मनोहर हेमनदास वंजानी (६२, डागा इस्पितळाजवळ, गांधीबाग) व राहुल भाऊदास वानखेडे (३८, स्मृती ले आऊट, दत्तवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही व्हीसीएजवळून रंगेहाथ पकडण्यात आले. ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिव्हिल लाईन्स व्हीसीएतून तिकीटाची हार्ड कॉपी घ्यायची होती. त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेटप्रेमींच्या रांगा होत्या. यासाठी पोलिसांचा बंदोबस्तदेखील तैनात होता. खबऱ्यांच्या माध्यमातून वंजानी व वानखेडे हे हेरिटेज हॉटेलजवळील गल्लीत जास्त दराने तिकीट विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

साउथ, ईस्ट स्टॅंडची तिकिटे जप्त

पोलिसांनी तेथे जाऊन चाचपणी केली असता तेथे दोघेही जास्त दराने तिकीट विकताना दिसून आले. ते लोकांना व्हीसीएचे कर्मचारी असल्याची बतावणी करत होते. वंजानीकडून पोलिसांनी साऊथ स्टॅंडची दोन तिकीटे तर वानखेडेकडून ईस्ट स्टॅंडची चार तिकीटे जप्त केली. वंजानी तीन हजारांचे तिकीट सहा हजारांना विकत होता तर वानखेडे ८०० रुपयांचे तिकीट दोन हजारांना देत होता. या दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. त्यांच्याकडे तिकीटे कुठून आली याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंडPoliceपोलिस