शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रिफिलिंग सेंटरमधून सुरू होती गॅस सिलिंडरची काळाबाजारी

By योगेश पांडे | Updated: April 8, 2025 22:43 IST

एजन्सीमधील डिलिव्हरी कर्मचारीच करत होते रिफिलिंग : घरगुती सिलिंडरमधून काढत होते १ ते २ किग्रॅ गॅस

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करून काळाबाजारी करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला. नारी परिसरातील अवैध रिफिलिंग सेंटरवर धाड टाकत पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. एका गॅस एजन्सीमधील डिलिव्हरी कर्मचारीच हा प्रकार करत होते. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.

मोहनसिंग जगदीशसिंग (२४, सिलावट, ढोलपूर, राजस्थान) व विष्णुकुमार कुलदीपसिंग रेहार (२२, सिलावट, ढोलपूर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नारी मार्गावरील दीपक टायर चौकातील प्लॉट क्रमांक ४९ येथे भाड्याने राहायचे. तेथेच ते रिफिलिंगचे रॅकेट चालवत होते. दोन्ही आरोपी सिव्हिल लाइन्स येथील डोमेस्टिक गॅस एजन्सीत कार्यरत होते व डिलिव्हरी करायचे. ते घरगुती वापराच्या एचपी सिलिंडरमधून नोझलच्या सहाय्याने निळ्या रंगाच्या कमर्शियल सिलिंडरमध्ये अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करायचे. पोलिसांना याची माहिती कळाली असता सोमवारी पावणेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी तेथे धाड टाकली. दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. घरगुती वापराच्या प्रत्येक सिलिंडरमधून ते एक ते दोन किलोग्रॅम गॅस कमर्शियल सिलिंडरमध्ये भरायचे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एचपी कंपनीचे १७ गॅस सिलिंडर, भारत कंपनीचे ७ गॅस सिलिंडर, इंडेन गॅस कंपनीचा १ कमर्शियल सिलिंडर, २ ट्रान्सफर नोझल असा ३.७६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

सिलिंडरच्या वजनाची करा तपासणी

एकीकडे एलपीजी सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. तर, दुसरीकडे शहरात नियमितपणे अवैध रिफिलिंगचे प्रकार समोर येत आहेत. गॅस सिलिंडरमध्ये गोलमाल करून ग्राहकांना चुना लावला जात आहे. त्यामुळेच घरी गॅस सिलिंडर आल्यावर त्याच्या वजनाची तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. तशी सूचनाच डिलिव्हरी स्वीकारताना कर्मचाऱ्यांना करून डोळ्यासमोर वजन तपासून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCylinderगॅस सिलेंडर