शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; आरपीएफकडून ठिकठिकाणी छापेमारी

By नरेश डोंगरे | Updated: May 13, 2023 18:36 IST

Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छडा लावला आहे. या संबंधाने येथील विमानतळावर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या काउंटरसह ठिकठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.

नरेश डोंगरेनागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छडा लावला आहे. या संबंधाने येथील विमानतळावर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या काउंटरसह ठिकठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.

 रेल्वेतील काही कर्मचारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील दलाल रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना रेल्वेचे सहजासहजी रिझर्वेशन मिळत नाही. सामान्य व्यक्तींना वेटिंग लिस्ट मध्ये दूरवरचा नंबर दाखवला जातो. दुसरीकडे एजंट कडे गेल्यास त्याच रेल्वेचे गाडीचे रिझर्वेशन सहजपणे उपलब्ध होते. त्यासाठी तो दलाल प्रत्येक तिकिटामागे संबंधित व्यक्तीकडून पाचशे रुपये घेतो. अशा प्रकारे रोज मोठ्या प्रमाणावर तिकिटांची हेरफेर करून रिझर्वेशनच्या गोरख धंद्यातून दलाल दर दिवशी लाखोंची कमाई करतात. ही रक्कम भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. त्याची कुणकुण लागल्यामुळे आरपीएफने ठिकठिकाणीच्या रेल्वे तिकीट काउंटरवर छापा मारून तपासणी सुरू केली. या संबंधाने रेल्वेच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी याबाबत अधिकृत माहिती देण्याचे टाळले. 

लोकमतने केला होता पर्दाफाश विशेष म्हणजे, रेल्वे तिकटांचा बिनबोभाट काळाबाजार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने काही दिवसांपूर्वी प्रकाशित करून संबंधित तपास यंत्रणांचे या गोरख धंद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच संबंधित तपास यंत्रणा दलालांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे