लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.हा आजार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, बोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता तसेच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील निमजी, मोहपा या गावांमध्ये संत्र्याच्या झाडावर दिसून आला आहे. या आजारासंदर्भात लदानिया म्हणाले की, यावर्षी निसर्गाचा असमतोल दिसून येत आहे. संततधार पाऊस झाल्यानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण संत्रा पिकासाठी प्रतिकूल आहे. आता झाडांना नवीन पाने येत आहे. ज्यामुळे काळी माशी आणि पांढरी माशी यासारख्या रस शोषण करणाऱ्या कीटकांना अंडी देण्याकरिता अनुकूल आहे. काळया माशीच्या उपद्रवामुळे पानावरती सुटी मोल्ड या बुरशीची (कोळशी) वाढ झालेली आढळून आली आहे. ही बुरशी संपूर्ण पानांना वेढा घालत आहे.फवारणीची योग्य वेळझाडांचे सर्वेक्षण केल्यानुसार मिळालेल्या नमुन्यात ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे लक्षात आले आहे. ही वेळ कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता योग्य वेळ आहे. या काळया व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी त्यांना मारणे आवश्यक आहे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड,अॅसिफीट किंवा डायमिथोएट या बुरशीनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. सुटी मोल्ड या बुरशीसाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड अशी बुरशीनाशक फवारण्याचा सल्ला संशोधन केंद्रातर्फे देण्यात आला आहे. नुकसान कमी होईलकाळी माशी, पांढरी माशी या रोगामुळे झाडे काळे पडतील, त्याचा परिणाम संत्रा पिकावर होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल, भावसुद्धा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आताच काळजी घेणे गरजेचे आहे.एम.एस. लदानिया,संचालक आयसीसीआर
संत्र्यावर काळी माशी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 8:00 PM
दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.
ठळक मुद्देअमरावती व नागपूर जिल्हा ग्रस्त : संत्रा उत्पादकांना आयसीएआर-सीसीआरआयचा अलर्ट