शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पाळणार काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:50 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत.

ठळक मुद्देसंविधान चौकात धरणे आंदोलन : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच आमदार निवास सभागृहात पार पडली. बैठकीत १ मे महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन करून काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. बैठकीला विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, प्रा. पुुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, मुकेश मासूरकर, विजया धोटे, अरुण केदार उपस्थित होते. बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांबाबत आढावा घेण्यात आला. सत्तारूढ भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याबाबत दिलेले आश्वासन आणि विदर्भवाद्यांची केलेली फसवणूक यावर चर्चा करण्यात आली. पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होत असून, सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्या पक्षाला विधानसभानिवडणुकीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पूर्व यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी विजया आगबत्तलवार, रुपाली सोमकुवर यांची पूर्व नागपूर शहर युवती आघाडी अध्यक्ष, तर रजनी शुक्ला यांची पश्चिम नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी माधव गावंडे, सुनील साबळे यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला मोरेश्वर टेंभुर्डे, विष्णू आष्टीकर, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, देविदास लांजेवार, राजेंद्रसिंग ठाकूर, जगदीश बद्रे, कृष्णराव भोंगाडे, किशोर पातनवार, कपिल इद्दे, मितीन भागवत, पौर्णिमा भिलावे, संतोष खोडे, वृषभ वानखेडे, दिलीप हगवणे, रविना शामकुळे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन