शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे ग्वालबंशी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:13 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे शुक्ला यांचा ९६३६ मतांनी केला पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला. ग्वालबंशी यांना एकूण १३,३८६ मत मिळाली. दुसऱ्या क्रमांकार काँग्रेसचे पंकज सुरेंद्र शुक्ला राहिले. त्यांना केवळ ३७५० मते मिळाली. अपक्ष उमेदवार अशोक देवराव डोर्लिकर हे २६१७ मतांनी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

गुरूवारी प्रभाग १२ (ड) च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. एकूण ३८.०९ टक्के मतदान झाले. ५८,१६२ मतदारांपैकी २२१५१ मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला. आज मतगणना पार पडली. मतगणनेत भारिप बहुजन महासंघाचे प्रफुल्ल देवराव गणवीर यांना १५५०, आम आदमी पार्टीचे आकाश सुरेश कावळे यांना ६९० मत मिळाली. १५२ मतदारांनी नोटाला पसंती दिली.शुक्रवारी मनपाच्या धरमपेठ झोनमध्ये सकाळी १० वाजता मतगणनेला सुरूवात झाली. सात फे ऱ्यांमध्ये मतगणना पूर्ण झाली. भाजपाचे विक्रम ग्वालबंशी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. शेवटपर्यंत ही आघाडी तशीच कायम राहिली. अंतिम फेरीचे निकाल आल्यानंतर मनपा उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांनी भाजपाचे विक्रम ग्वालबंशी यांना विजयी घोषित केले. यावेळी सहायक आयुक्त व निवडणूक अधिकारी प्रकाश वराडे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, धरमपेठ झोनचे सभापती अमर बागडे, माजी सभापती प्रमोद कौरती उपस्थित होते.विशेष म्हणजे भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. जगदीश ग्वालबंशी यांनी काँग्रेसचे दिनकर वानखेडे यांचा १६६७ मतांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा विक्रम ग्वालबंशी यांचा रेकॉर्ड विजय भाजपासाठी आनंददायी आहे.प्रभागातील उर्वरित कामांना पूर्ण करणारविजयानंतर विक्रम ग्वालबंशी यांनी सांगितले की, ते प्रभाग १२ (ड) मध्ये त्यांच्या वडीलांनी केलेल्या कामांमुळेच निवडूण आले. त्यामुळे प्रभागात जी काही कामे शिल्लक राहिली आहे, ते पूर्ण करणार. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्याला पूर्णपणे सार्थक करण्याचा प्रयत्न करीत राहणार.प्रभागाला विकसित करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री राहिलेले विक्रम बी.कॉम. पर्यंत शिकलेले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा