शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नागपूर जिल्ह्यात मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:20 IST

जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला.

ठळक मुद्दे पालकमंत्री बावनकुळे विजयाचे शिल्पकार भाजपचे १७ पैकी ८ नगरसेवक विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. निनावे यांना २४४५ मते मिळाली.मौद्या नगर पंचायतीच्या १७ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवारी ७७.५६ टक्के मतदान झाले होते. यात नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १०१ उमेदवार रिंगणात होते. सोेमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.मौद्यात राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मौैदा नगरपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत पालकमंत्र्यांची निवडणूक यंत्रणा मौद्यात कार्यरत होती.मौद्यातील १७ वॉर्डात भाजपाचे ८, काँग्रेसचे ५, शिवसेनेचे २ आणि २ अपक्ष उमेदवार निवडूण आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष शिवराज गुजर मौद्याचे असले तरी राष्ट्रवादीला येथे फार चमत्कार करता आला नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पुुष्पा गभणे १०१० मते मिळवित चौथ्या क्रमांकावर राहील्या. येथे शिवसेनेच्या रंजना धनजोेडे यांनी १५५८ मिळवित तिसरा क्रमांक गाठला.असा आहे निकाल :नगराध्यक्ष पदभारती सोमनाथे (भाजपा) - २५७३ मतेरोशनी निनावे (कॉग्रेस) - २४४५ मतेरंजना धनजोडे (शिवसेना) - १५५८ मतेपुष्पा गभणे (राष्ट्रवादी) - १०१० मतेभारती सोमनाथे १२८ मतांनी विजयीएकूण जागा - १७भाजपा - ८काँग्रेस - ५शिवसेना - २राष्ट्रवादी - ०अपक्ष - २हे आहेत नगरसेवक :वार्ड क्र . १ - भिमराव मेश्राम (अपक्ष), वार्ड क्र . २ - जॉनी चलसानी (भाजपा), वार्ड क्र .३ - प्रियंका काळमेघ (कॉग्रेस ), वार्ड क्र . ४ - शशिकला पत्रे (कॉग्रेस), वार्ड क्र . ५ - किशोर सांडेल (कॉग्रेस), वार्ड क्र . ६ - विमल पोटभरे (भाजपा ), वार्ड क्र . ७ - वैशाली चव्हाण (अपक्ष), वार्ड क्र . ८ - सुनिता पाराशर (भाजपा), वार्ड क्र . ९ - शुभम तिघरे (कॉग्रेस), वार्ड क्र . १० - वैशाली मेहर (शिवसेना), वार्ड क्र . ११- सुषमा कुंभलकर (भाजपा ), वार्ड क्र . १२ - सुनिल रोडे (भाजपा), वार्ड क्र . १३ - देविदास कुंभलकर (भाजपा ), वार्ड क्र . १४ - शिवराज माथुरकर (शिवसेना ), वार्ड क्र . १५ - नंदा इनवाते (कॉग्रेस), वार्ड क्र . १६- राकेश धुर्वे (भाजपा), वार्ड क्र . १७ - शालिनी कुहीकर (भाजपा).

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा