शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'सेलेब्रिटी ट्विट' प्रकरणात भाजपच्या १२ 'इन्फ्लुएन्सर'चा सहभाग : अनिल देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:02 IST

Celebrity tweet case ‘सेलेब्रिटी ट्विट’बाबत लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या चौकशीचा प्रश्नच नव्हता. मी जो आदेश दिला, तो केवळ भाजप आयटी सेलसाठी होता. प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली आहेत, असा खळबळजनक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांसमवेत ते बोलत होते.

ठळक मुद्देलता मंगेशकर, सचिन तेंडुलकर नव्हे, भाजपच्या ‘आयटी’ सेलच्या चौकशीचा आदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘सेलेब्रिटी ट्विट’बाबत लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या चौकशीचा प्रश्नच नव्हता. मी जो आदेश दिला, तो केवळ भाजप आयटी सेलसाठी होता. प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली आहेत, असा खळबळजनक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांसमवेत ते बोलत होते.

‘सेलेब्रिटी ट्विट’ प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. जे ट्विट आले, त्याबाबत भाजपच्या आयटी सेलची चौकशी करू, असे मी सांगितले होते; मात्र माझ्या तोंडी लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांची चौकशी करू, असे टाकण्यात आले. या प्रकरणात भाजपशी संबंधित लोक जुळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापले असताना, या प्रकरणात नियमांनुसारच चौकशी सुरू असल्याची गृहमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. नियमानुसारच चौकशी होईल व त्यानंतर जे काही समोर येईल त्याच्या आधारावर सरकार पुढील पावले उचलेल. या प्रकरणात चौकशी होणार, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. पुणे पोलीस योग्य तपास करत आहेत. विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMediaमाध्यमे