शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपूर जिल्ह्यात कॉँग्रेसच्या आमदाराची भाजप कार्यकर्त्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 3:29 PM

सावनेर येथील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. 'जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू' असे त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देहातात भाजपचा झेंडा दिसल्यासघरात घुसून मारणार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावनेर येथील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. 'जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू' असे त्यांनी सांगितले आहे.सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात गुरुवारी केदार यांनी ही धमकी दिली. केदार यांच्या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी केदार यांच्या कृतीचा निषेध करीत यासंदर्भात दखल घेण्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली.सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथे गुरुवारी स्टार बसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वादाचे ब्रेक लागले. कार्यक्रमाच्या आयोजनावरुन काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमोरासमोर आले.सिल्लेवाडा ग्राम पंचायतीच्या वतीने सिल्लेवाडा-नागपूर स्टार बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता लालचौक, सिल्लेवाडा येथे ठेवण्यात आला होता. आ.केदार या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तर भाजपच्या वतीने ग्रा.पं.सदस्य अनिल तंबाखे यांच्या पुढाकाराने सकाळी १० वाजता बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार उद्घाटक होते. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाला डावलून भाजपने परस्पर बस सेवेचा उद्घाटन कार्यक्रम सुरु केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. तेवढ्यात केदार कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी कार्यक्रमाचे श्रेय लाटण्यावरुन कॉँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. पोतदार आणि केदार यांच्यातही कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाला. भाजपचा कार्यक्रम झाल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी केदार यांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात केदार यांनी उपरोक्त विधान केले. केदार यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून याचा निषेध करण्यात येत आहे.केदार यांची गुंडगिरी सहन करणार नाही -पोतदारसिल्लेवाडा येथील कार्यक्रमात आ.सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेली धमकी ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. केदार यांनी गुंडगिरी भाजप सहन करणार नाही असे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.सिल्लेवाडा येथील घटनेबाबत नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी. यासंदर्भात भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सावनेर तालुक्यात गुंडांचा हैदोस वाढला आहे. रेती माफियापासून तर अवैध धंदे करणाऱ्यांना केदार यांचा आश्रय असल्याचा आरोप पोतदार यांनी केला.भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानाने पक्षाचा झेंडा आपल्या घरावर लावेल, कुणी त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, असा इशार पोतदार यांनी दिला. या घटनेबद्दल आम्ही पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, सोनबा मुसळे, संजय टेकाडे, प्रकाश टेकाडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार