शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता

By कमलेश वानखेडे | Updated: September 6, 2023 17:35 IST

फडणवीसांच्या धर्तीवर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे

नागपूर : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ज्या पद्धतीने वेगळे आरक्षण दिले होते, त्याच पद्धतीने वेगळे आरक्षण द्यायला हवे. दुसऱ्या समाजात आरक्षण देणे योग्य होणार नाही. ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच मिळाले पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. सरकार असा कुठलाही निर्णय घेणार नाही की ज्यामुळे दुसरा कुठला समाज नाराज होईल, अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण दिले जाण्याची शक्यता नाही, असे संकेत मिळाले आहेत.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मी भाजपचा प्रदेश अध्यक्ष म्हणून सांगतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. फडणवीस यांच्या काळात मराठा समाजालाा आरक्षण देत सवलती देण्यासाठी विशेष बजेट मंजूर करण्यात आले होते. त्या पद्धतीने पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस-पवार सरकार आरक्षण व सवलती देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यावरच त्यांनी भर दिला.

शरद पवार यांनी ४० वर्षे राजकारणात राहून मराठा समाजाचा आर्थिक, सामाजिक मागासलेपणाचा अहवाल तयार केला नाही. आता पवारांच्या जवळचे लोक आंदोलनात सहभागी होऊन दिशाभूल करीत आहेत. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. अहवाल येणारच आहे. सरकार विधिमंडळात काय काय घडले ते सांगेल. तेव्हा सर्वकाही समोर येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. मराठवाडा भागात निजामशाहीच्या काळातील काही प्रमाणपत्रावर कुणबी समाजाचा उल्लेख आहे. त्या आधारावर प्रमाणपत्र दिले जात आहे. हे शोधण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. त्यात सर्वबाबी स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीसांनी मोठं मन केले, ठाकरेंनी माफी मागावी

- गृह विभागाच्या अधिकाऱ्याकडून चूक झाली म्हणून मोठं मन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. त्यावेळी मराठा आरक्षण गेले ते उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियतेमुळे गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस