शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

भाजपचा नारा, नको सेनेला थारा

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर

 महापालिका स्वबळावर लढा : नेत्यांचे ‘एकला चलोरे’नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप ‘नंबर वन’ झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या पावनेदोन वर्षाच्या कार्यकाळात उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. अशा राजकीय परिस्थितील आपला घास दुसऱ्याला कशासाठी द्यायचा, असा विचार भाजप नेत्यांनी मांडला आहे. यातूनच महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता ‘एकला चलोरे’ चा नारा भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीत देण्यात आला.महापालिकेच्या निवडणुकीला सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाजपने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहर कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी युती तुटली तर भाजपला मोठा फटका बसेल असे अंदाज लावले जात होते. मात्र, अंदाज चुकले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. याच धर्तीवर महापालिका निवडणूक स्वबळावर लढल्यास एकहाती सत्ता येईल, असा सूर पदाधिकारी व आमदारांचा होता.भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून सत्तेत सहभागी असूनही शिवसेना टीका करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर शिवसेना कार्यकर्त्यांची मजल भाजप नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला. आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वबळावर निवडणुका लढवून महापालिकेत तिसऱ्यांदा कमळ फुलविण्याचा संकल्प जाहीर केला.गेल्या निवडणुकीतही महापालिकेत भाजपने शिवसेनेला बाजूला सारून अपक्ष व छोट्या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ न सत्ता आणली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी ‘मिशन १००’ हाती घेतले असून महापालिकेत १५१ पैकी १०० ते १२० जागा निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ३० आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गल्ली ते दिल्ली भाजप सरकार हे स्वप्न साकार झालेले आहे. महापालिके ची आर्थिक स्थिती चांगली नसताना अनेक अडचणींचा सामना करून शहराला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. कृष्णा खोपडे यांनी पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत एसएनडीएल कंपनीवर हल्लाबोल केला. याला कार्यकर्त्यांनी चांगलीच दाद दिली. परंतु भाजपची चौफेर सत्ता असूनही खोपडे यांनी जनतेच्या मनातील भावना मांडल्याने सर्वकाही ठीकठाक नसल्याचा इशारा मिळाला.(प्रतिनिधी)शिवसेनेला ग्लुकोज कशासाठी ?नागपुरात तशीही शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे. अशात युती करून सेनेला ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. शिवसेना युती करताना जिंकणाऱ्या जागांवर अडून बसते. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान व जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना वंचित रहावे लागते. या वेळी युती न करता तेवढया जागांवर भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जावे, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. पद नसल्याने कार्यकर्ते नाराजसर्वच कार्यकर्त्यांना निवडणुक ीत संधी मिळणे शक्य नसते. त्यामुळे संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची विविध समित्यावर नियुक्ती केली जाते. परंतु आमदारांनी सुचविलेल्या यादीतील नावे जाचक निकषामुळे वगळली जातात. कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी यासारखे लहान पदही न मिळाल्याने नाराजी आहे. याचा फटका निवडणुकीत बसण्याचे संकेतही काही वक्त्यांनी दिल्याने वाटते तितकी ही निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले.