भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 08:15 AM2021-09-02T08:15:00+5:302021-09-02T08:15:01+5:30

Nagpur News राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना श्रावणात शिवालयांत प्रवेशबंदी का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे, परंतु नागपुरातील इतर प्रमुख पक्षांकडून मात्र मंदिर उघडण्याला विरोध करण्यात येत आहे.

BJP says open places of worship, others say wait | भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

Next
ठळक मुद्देप्रार्थनास्थळांवरून राजकारण कशाला ? ‘कोरोना’ गेल्यावर घ्या प्रत्यक्ष हरी दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावी यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना श्रावणात शिवालयांत प्रवेशबंदी का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे, परंतु नागपुरातील इतर प्रमुख पक्षांकडून मात्र मंदिर उघडण्याला विरोध करण्यात येत आहे. सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ हीच भूमिका घेणे समाजाच्या हिताचे राहील, असे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. (BJP says open places of worship, others say wait)

प्रार्थनास्थळे उघडायलाच हवी : भाजप

गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असणाऱ्यांचे रोजगार बंद असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. इतर राज्यातील मंदिरे सुरु असून महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद आहेत. एकीकडे सरकारने मद्यालयांना परवानगी दिली आहे. तिकडे गर्दी होत नाही का व ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

कोरोनाला परतावल्यानंतरच मंदिरे उघडावीत : शिवसेना

शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली असता सध्या ‘कोरोना’पासून बचाव महत्त्वाचा असल्याने मंदिरे उघडण्याची आवश्यकता नाही हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबत भावना मांडल्याने त्यांना शिवसेना नेत्यांचे समर्थनच आहे.

प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर नुकसान झाले तर : काँग्रेस

प्रार्थनास्थळे उघडावी ही मागणी होत आहे; मात्र प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर ‘कोरोना’चा संसर्ग वाढला तर समोर येणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण राहणार. प्रार्थनास्थळांचा आडोसा घेऊन केंद्र शासनाचे अपयश लपविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

देवाला सध्या घरीच पूजावे - राष्ट्रवादी कॉंग्रेस

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रार्थनास्थळे उघडायला हवी असे अनेकांना वाटते. मात्र स्थिती तशी नाही याची त्यांना जाण आहे. केवळ भाजपकडूनच अशी मागणी होते आहे. ‘कोरोना’चे संकट पाहता लोकांनी काही दिवस घरूनच देवाचे पूजन करणे हिताचे राहील.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

हजारो कोटींची उलाढाल ठप्प

श्रावण महिन्यांत श्रावण सोमवारसह विविध सण असतात. याशिवाय अनेक मोठ्या मंदिरांमध्ये लोक दर्शनाला जात असतात; मात्र प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेशबंदी असल्याने तेथे विक्री करणाऱ्यांचे हाल होत आहेत. शिवाय मंदिरांना मिळणाऱ्या देणग्यांवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. जर एकूण चित्र पाहिले तर नागपूर व जिल्ह्यात पाचशे कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय पाच हजारांहून अधिक जण बेरोजगार झाले आहेत.

Web Title: BJP says open places of worship, others say wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर