शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींविरोधात भाजपचे नागपुरात आंदोलन

By योगेश पांडे | Updated: February 9, 2024 17:32 IST

कॉंग्रेस ओबीसीविरोधी, पटोले-वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

योगेश पांडे, नागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील वक्तव्यावरून भाजपने नागपुरात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. राहुल गांधी वारंवार ओबीसीविरोधी वक्तव्ये करत असून पक्षाची भूमिकाच ते मांडत आहेत. आता तरी नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी राजिनामा द्यावा असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

नागपुरमध्ये राहुल गांधींविरोधात संविधान चौकात भाजपने सकाळी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. आणि, त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. शनिवारी राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, अशोक धोटे, अर्चना डेहनकर, बाल्या बोरकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहीत पारवे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, रोहित मुसळे, महेश दिवसे, दिलेश ठाकरे, डॉ. प्रिति मानमोडे, नरेश मोटघरे, जयप्रकाश गुप्ता, श्रद्धा पाठक, नरेंद्र धनोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी