शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

भाजप कार्यालयात जल्लोष देवडिया भवनला मात्र कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:41 IST

नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या देवडिया भवनात सकाळपासून एकही कार्यकर्ता फिरकला नाही. दिवसभर कार्यालयाला कुलूप लागलेले होते.

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा : गुलाल उधळला, पेढे वाटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या देवडिया भवनात सकाळपासून एकही कार्यकर्ता फिरकला नाही. दिवसभर कार्यालयाला कुलूप लागलेले होते. 

नागपूरच्या मतमोजणीत पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत पेढे भरविले. दिवसभर कार्यालयात कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती. बहुतांश कार्यकर्ते कळमना भागात असल्यामुळे मोजकेच कार्यकर्ते कार्यालयात बसून होते. टीव्हीवर निकाल पाहत कार्यकर्ते प्रत्येक फेरीचा निकाल कधी लागतो, याकडे लक्ष देऊन होते. सायंकाळी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. कार्यालयावर रोषणाई करण्यात आली. ढोलताशे वाजवून, फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. उत्साहात महिला कार्यकर्त्या फुगडी खेळल्या.दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट होता. पहिल्या फेरीपासून काँग्रेसची पीछेहाट सुरू झाल्यामुळे एकही कार्यकर्ता देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकला नाही. एकामागून एक जाहीर होणाऱ्या निकालात सातत्याने काँग्रेसचे नाना पटोले यांची पीछेहाट झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाकडे जाणे टाळले. दिवसभर काँग्रेसच्या कार्यालयाला कुलूप लावलेले होते. कार्यालयाच्या खाली पोलीस तैनात होते. पण कार्यकर्त्यांची वर्दळ नसल्याने पोलीस एकमेकांशी गप्पा मारत पहारा देत बसले होते. सायंकाळपर्यंत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकला नाही.निकालासाठी भव्य स्क्रीन पण पाहायला कुणीच नाहीकाचीपुरा येथे ‘जय जवान जय किसान संघटने’चे कार्यालय आहे. हे कार्यालय काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचाराची कंट्रोल रुम होती. कार्यालयाच्या बाहेर एका मोठ्या स्क्रीनवर निवडणुकीचा निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु पहिल्या फेरीपासूनच माघारल्यामुळे पटोले यांचा एकही कार्यकर्ता या स्क्रीनवर निकाल पाहण्यासाठी फिरकला नाही. रस्त्याने जाणारा एखादाच वाहनचालक उभा राहून दोन मिनिटे निकाल पाहून निघून जात होता. कार्यालयाच्या आत २० ते २२ कार्यकर्ते टीव्हीवर निकाल पाहत बसले होते. काँग्रेसचा राज्यात झालेल्या धक्कादायक पराभवाबद्दल ते आपसात चर्चा करीत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस