शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने लोकशाही प्रस्थापित करणारी यंत्रणाच ताब्यात घेतली : माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:10 IST

सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला.

ठळक मुद्दे भाजपाची सरकार नाही मालकशाही आहे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकशाही प्रस्तापित करणारी यंत्रणा भाजप सरकारने ताब्यात घेतली आहे. लोकशाहीचे प्रमुख शस्त्र असलेली मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएमच्या माध्यमातून ताबा मिळविला आहे. ज्या ईव्हीएमला जगाने नाकारले, सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम भरोश्याचे नाही, असे ताशेरे ओढले, त्या ईव्हीएमवर भाजपाचे नियंत्रण असल्याने देशातील जनतेला फसविण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला.जस्टीस मुव्हमेंट तर्फे ‘पॉलिटिक्स इज दे गेम ऑफ पॉसिबल’ या विषयावर सोमवारी डॉ. आंबेडकर सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्य वक्ता म्हणून कोळसे पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाला आंबेडकरी विचारवंत नागेश चौधरी, अ‍ॅड. मिलींद पखाले, डॉ. बी.एस. गेडाम, प्रज्वला थत्ते उपस्थित होत्या. यावेळी कोळसे पाटील म्हणाले की, बहुजन समाज हा फुले शाहू आंबेडकर यांच्या त्यागातून शिकला आहे. त्यामुळे बुद्धी, संपत्ती समाजाने मिळविली आहे. पण समाजाने मिळविलेली बुद्धी व संपत्ती समाजाच्या प्रगतीसाठी आज लावली जात नाही. समाजातील लोक म्हणतात बाबासाहेबांनी आम्हाला शिकविले. पण समाजाला आज बाबासाहेबांनी आम्हाला का शिकविले, हे सांगण्याची गरज असल्याचे कोळसे पाटील म्हणाले. देशाची व्यवस्था सडलेली असल्याचे सांगत ते म्हणाले की, या व्यवस्थेला बदलाची सुरूवात नागपुरातून झाली पाहिजे. बाबासाहेबांचे सोशनमुक्त समाजाचे तत्वज्ञान हेच समाजाला तारू शकते. राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले की, चोर आहे तोच राजकारणात फीट आहे. यावेळी रामविलास पासवान यांचे उदाहरण देताना सांगितले की, सत्तेच्या लालसेपोटी पासवान म्हणतात की मोदी खरे आंबेडकरवादी आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुजित बागडे यांनी केले. सेव्ह मेरीट सेव्ह नेशन आरक्षणविरोधीयावेळी उपस्थित वक्त्यांनी नागपुरातून सुरू झालेल्या ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या चळवळीवर ताशेरे ओढले. ही चळवळ आरक्षण विरोधी आहे. या चळवळीच्या माध्यमातून मेरीटच्या नावावर कपट कारस्थान आखले जात आहे. आरक्षणाच्या विरोधात ही छुपी लढाई आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपा