शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार विसरले आश्वासनांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:09 IST

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला.

ठळक मुद्देहलबा समाजाच्या न्यायासाठी काँग्रेसचे धरणे

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला. 

काँग्रेसतर्फे हलबा समाजाच्या न्याय मागण्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. नंदा पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, डॉ. अमोल देशमुख, माजी नगरसेवक रमण पैगवार, आयकर विभागाचे माजी आयुक्त धनंजय धार्मिक, किशोर जिचकार, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुसैन, गीता जळगावकर, राजेंद्र नंदनकर, गोलू सदावर्ती, राधेश्याम बारापात्रे, कल्पना अडमकर, महेश श्रीवास्तव, हरेंद्र शाहू, सचिन मेश्राम, दमयंती बावने, बाळकृष्ण वट्टेवार, अभिषेक मोहाडीकर यांच्यासह मोठ्या संख्येने हलबा समाज बांधव सहभागी झाले होते. धरण्यावर बसलेल्या हलबा बांधवांनी हातात फलक घेऊन, जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना नंदा पराते म्हणाल्या की, काँग्रेसने सत्तेवर असताना वैधता प्रमाणपत्राच्या नावावर अन्याय होणाऱ्या आदिवासींना संरक्षण दिले होते. पण भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने दिलेले संरक्षण काढून टाकले. उच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणाविरोधात भाजपाने सुप्रीम कोर्टात जाऊन अन्यायग्रस्त आदिवासींचे संरक्षण काढले. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात कबूल केले की डिसेंबर २०१९ पर्यंत अन्यायग्रस्त आदिवासींना नोकरीवरून काढून टाकू. भाजप सरकारने हलबा, माना, धनगर, हलबी, गोवारी, धोबा, मन्नेवार, छत्री ठाकरू, अशा ३३ अन्यायग्रस्त आदिवासींच्या पोटावर लाथ मारली आहे. त्यामुळे समाजाने आपल्या अन्यायाच्या विरोधात भाजपाला धडा शिकविण्याचे आवाहन पराते यांनी केले.

टॅग्स :Halba Communityहलबा समाजagitationआंदोलन