शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते खोळंबले; रेल्वेगाडी दुपारी २ ला निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:04 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापनदिन सोहळ्याला जाण्यासाठी खास ठरविलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत भाजप व रेल्वे प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फटका आज येथील अजनी स्थानकावर जमा झालेल्या दीड दोन हजार कार्यकर्त्यांना बसला.

ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव नडलापाच-सहा तासांची कंटाळवाणी प्रतिक्षा

 

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर:  

गाडीची निर्धारित वेळ दहाची असल्याचे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले असताना ही गाडी सकाळी सव्वा आठलाच रवाना झाली.  कार्यकर्त्यांसाठी गाडीची सोय करून ती निघेपर्यंतचा पाच सहा तासांचा काळ या कार्यकर्त्यांना अजनीच्या लहानशा रेल्वेफलाटावरच जिथे जागा मिळेल तिथे बसून काढावा लागतो आहे. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.मुंबईच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रभागातून किमान १००० कार्यकर्ते आणावेत अशी सूचना दिली गेली असल्याने नागपुरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे निघण्यास सज्ज झाले होते. मात्र गाडीच्या वेळेतील घोटाळ््यामुळे त्यांना गुरुवारचा अर्धा दिवस अजनीच्या रेल्वे फलाटावरच तिष्ठत बसून काढावा लागतो आहे. यातील काहींनी घरून आणलेले डबे सोडून जेवणे सुरू केली तर काहींनी जवळपासच्या लहानशा हॉटेल्सचा पेटपुजेसाठी आश्रय घेतला. यात काही कार्यकर्ते नागपूरच्या ग्रामीण भागातूनही आलेले आहेत. त्यांचेही यात हाल होत आहेत.

 समन्वयाच्या अभावाने अशी झाली गडबड... 

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते.   

 

टॅग्स :BJPभाजपा