शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 09:53 IST

भाजपा व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महादुला नगर पंचायतवर भाजपाने पुन्हा एकदा झेंडा फडकविला आहे.

ठळक मुद्देन.पं. निवडणूक निकाल बावनकुळेंचे वर्चस्व कायम राजेश रंगारी नगराध्यक्ष

दिनकर ठवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महादुला नगर पंचायतवर भाजपाने पुन्हा एकदा झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्षपदासह ११ जागेवर दणदणीत विजय मिळवीत राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादुला न.पं.वर पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवले आहे.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राजेश रंगारी यांनी ४,१६३ मते मिळवीत काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांचा २८० मतांनी पराभव केला. रत्नदीप यांना ३,८८३ मते मिळाली. महादुला नगर पंचायतसाठी रविवारी ६२.८२ टक्के मतदान झाले होते. कमी मतदानाचा कुणाला फायदा होईल, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मतदारांनी मात्र भाजपाला कौल दिला. एकूण १७ प्रभागात झालेल्या या निवडणुकीत ११ जागेवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. १७ ही प्रभागात बसपाच्या हत्तीने काँग्रेसच्या विजयाचे गणित बिघडविले.बसपाने न.प.ची एक जागा मिळविली तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. शिवसेनेला मात्र खाते उघडता आले नाही. १७ नगरसेवकांच्या या नगर पंचायतमध्ये यापूर्वी भाजपाचे १५ तर काँग्रेसचे २ नगरसेवक होते. महादुला न.पं.साठी नगराध्यक्षपदासाठी अंत्यत चुरशीची निवडणूक झाली. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेरीत काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांनी आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र त्यांच्या विजयाची घोडदौड अपक्ष आणि बसपा उमेदवाराने रोखली आणि भाजपचे राजेश रंगारी २८० मतांनी विजयी झाले.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत २८०९ मते मिळविणारे अपक्ष उमेदवार पवन पखिड्डे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपकडे नगराध्यक्ष पदासाठी पखिड्डे यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपातील काही असंतुष्टांचा पाठिंबा मिळेल व काँग्रेसचे जुने समर्थक आपल्या सोबत राहातील असे पखिड्डे यांचे विजयाचे गणित होते. त्यांच्या उमेदवारीने भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतावर निश्चितच प्रभाव पडला. काँग्रेसचे प्रेम गजभारे यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने यांचा फटकाही रत्नदीप रंगारी यांना बसला. गजभारे यांना ३५१ मते मिळाली. यासोबतच बसपाचे चिरकुट वासे यांनी ९०० मते मिळविल्याने काँग्रेसच्या विजयाची आशा मवाळ झाली.

महादुला नगर पंचायत निवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनतीने काम केले. जनतेने भाजपाच्या विकास कामाची पावती दिली. यासोबतच स्मार्ट महादुल्याच्या निर्मितीसाठी भाजपावर पुन्हा विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरविणे आता आमचे काम आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर जिल्हा

महादुल्याच्या जनतेने भाजपावर विश्वास दाखविला. हा कार्यकर्त्यांचा आणि महादुल्यातील जनतेचा विजय आहे.- राजेश रंगारी, नवनिर्वाचित, नगराध्यक्षदेशमुख यांचा विक्रमप्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष असलेले मंगेश सुधाकर देशमुख यांनी ६५८ मते मिळवीत मोठ्या मताने विजय संपादित केला. त्यांनी भाजपाचे निखील कडू यांना १२७ तर काँग्रेसचे सचिन बोंडे यांना ८९ मतावर रोखले. देशमुख यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. कॉँग्रेसशी दुरावा निर्माण झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले.

टॅग्स :BJPभाजपा