शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेविका हत्तीठेले यांची सदस्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:01 IST

BJP corporator Hattithele's membership canceled प्रभाग ५ (ब) येथून निर्वाचित भाजपच्या नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची सदस्यता नगरविकास विभागाने रद्द केली आहे.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र सादर केले नव्हते : नगर विकास विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रभाग ५ (ब) येथून निर्वाचित भाजपच्या नगरसेविका दुर्गा चंद्रभूषण हत्तीठेले यांची सदस्यता नगरविकास विभागाने रद्द केली आहे. हत्तीठेले या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडणूक जिंकून मनपात पोहोचल्या होत्या. परंतु ठराविक मुदतीत त्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

नगरविकास विभागातर्फे बुधवाारी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ठराविक कालावधीत जाात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसाार आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारास सहा महिन्याच्या आत जात वैधता तपासणी समितीकडून प्रमाणपत्र साादर करणे बंधनकारक असते. उमेदवारी अर्ज सादर करताना यासंदर्भात प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते. २३ जानेवारी २०१७ रोजी निवडून आलेल्या हत्तीठेले यांना २३ ऑगस्ट२०१७ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावयाचे होते. परंतु त्यांनी ते केले नाही. दरम्यान ४ सप्टेंबर २०१७ रोजी काही नगरसेवकांनी हत्तीठेले यांना निलंबित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. दरम्यान राज्य सरकारने प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवून दिली. परंतु त्यानंतरही त्या जात वैधताा प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाही. १ ऑक्टोबर २०१८ रोजी मनपा प्रशासनाने नगर विकास विभागाला यासंदर्भात माहिती दिली. तेव्हापासून हत्तीठेले यांच्या सदस्यता संदर्भातील निर्णय राज्य सरकारकडे विचाराधीन होता. बुधवारी नगरसविकास विभागाने त्यांची सदस्यता रद्द करण्याचे आदेश जारी केले.

उपनिवडणुकीवर प्रश्नचिन्ह

हत्तीठेले यांची सदस्यता रद्द झाल्याने प्रभाग ५ (ब) या जागेवर नियमानुसार उपनिवडणूक घ्यावी लागेल. परंतु मनपाच्या सर्वसाधारण निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तसेच नगरविकास विभागाच्या आदेशातही या जागेवर उपनिवडणूक होईल किंवा नाही, याची माहिती दिलेली नाही, त्यामुळे या जागेवर निवडणूक होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका