शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला; विदर्भवादी संघटनांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:48 IST

वेगळ्या विदर्भसाठी लढा देणाऱ्या सर्व विदर्भवादी संघटनांच्यावतीने येत्या ११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक

आॅनलाईन लोकमतनागपूर : वेगळ्या विदर्भसाठी लढा देणाऱ्या सर्व विदर्भवादी संघटनांच्यावतीने येत्या ११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्ला चढविला. विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन देणाऱ्या भाजपाने विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला असून आता आरपारच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. विदर्भाच्या मागणीला जनतेचा पाठिंबा नाही अशा भ्रमात असलेल्या भाजपा सरकारला हे आंदोलन जागे करणारे ठरेल, असा दावा अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला.अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, भाजपाच्या विद्यमान नेत्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन केले. प्रतिज्ञापत्रावर वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले. मात्र आता ते घूमजाव करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही असे सांगतात तर सक्षम केल्यानंतर विदर्भ देण्याची भाषा केंद्रीय मंत्री गडकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले असून विदर्भ राज्य झाल्याशिवाय पर्याय नाही, असे चिठ्ठीत नोंदवून वाशिमच्या ज्ञानेश्वर मिसाळ नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली. तरीही सरकार जागे होत नाही. याला सडेतोड उत्तर म्हणून ११ डिसेंबरला विदर्भ बंद पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडी, जनमंच, विदर्भ माझा, विदर्भ कनेक्ट, जनसुराज्य पार्टी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) , बहुजन सेना, आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला. विदर्भातील सर्व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. यासोबत सर्व संघटनांचे नेते व्हेरायटी चौकात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, विष्णू आष्टीकर, नीरज खांदेवाले, देवेंद्र वानखेडे, बाळू घरडे, राजेश बोरकर यांच्यासह विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.ज्वाला धोटेचा पाठिंबावेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढा देणाऱ्या विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे यांनी पत्रपरिषदेतून ११ डिसेंबरच्या विदर्भ बंदला पाठिंबा जाहीर केला. यावेळी नगरसेवक नितीन साठवणे, युवासंघाचे अध्यक्ष असलम खातमी, राहुल मोरे, शाहेब शेख, सागर रहाटे, अजय जाधव, सचिन चंदनखेडे, सोनू महाजन , अतुल डहरवाल उपस्थित होते.

 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटप