शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील पाणी पॅकेजिंग कंपनीवर बीआयएसची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:11 IST

नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे.

ठळक मुद्देबालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेसवर कारवाई अवैध आयएसआय मार्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. माहितीच्या आधारे भारतीय मानक ब्युरोच्या नागपूर शाखेचे प्रमुख आर.पी. मिश्रा यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कंपनीवर धाड टाकली.कारवाईत कंपनीच्या गोदामातून बॅली बॅ्रडची ३५ आणि ब्ल्यू किंग ब्रॅण्डचे २० लिटरचे १३८ कॅन तसेच १७३ बॉटल जप्त केल्या. या सर्व पॅकिंगवर कंपनीच्या संचालकांनी भारतीय मानक ब्युरोकडून परवाना न घेता अवैधरीत्या आयएसआय मार्कचा उपयोग करण्यात येत होता.बॅली ब्रॅण्डच्या ३५ कॅनवर पॅकेजिंग कंपनी श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनी (शंकरपूर) अशी नोंद करण्यात आली होती. तर ब्लू किंग ब्रॅण्डच्या १३८ कॅनवर सनशाईन ब्रेव्हरेजेस (नरेंद्रनगर) आणि येरने अ‍ॅग्रो इंड्रस्टीज (जसपूर-नागपूर) यांच्यातर्फे पॅकेजिंग करण्यात आल्याची नोंद केली होती.या प्रकारे विनापरवाना अवैधरित्या पॅकेज पाण्याचे कॅन वा बॉटलवर आयएसआय मार्क लावून विक्री करणे गैरकायदेशीर आहे.

समारंभात मिळणारे पाणी अशुद्धच!ब्युरोच्या सूत्रानुसार लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रमात कॅनमध्ये लोकांना देण्यात येणारे पाणी नियमानुसार आयएसआय मार्कचे नसते. ते पाणी अशुद्धच आहे. कॅनमधील पाणी केवळ एक दिवसासाठी पिण्यायोग्य असते. पण लोक या पाण्याला शुद्ध पाणी समजतात. हे चुकीचे आहे.

पॅकिंगवर आयएसआय मार्क आवश्यकभारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनुसार कोणत्याही पारदर्शक पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्क असणे आवश्यक आहे. ब्युरोकडून परवाना प्राप्त करणारी कंपनीच पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर उपरोक्त ट्रेडमार्कचा उपयोग करू शकते. मान्यताप्राप्त कंपनीच्या बॉटलचे पाणी ३० दिवसांपर्यंत पिण्यायोग असते. अशा स्थितीत काही कंपन्या अवैधरीत्या पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्कचा उपयोग करून ग्राहक आणि ब्युरोची फसवणूक करीत आहे.

टॅग्स :raidधाड