शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक पक्षी झाडावरून पडलाय हो... खाकी वर्दीतूनही प्रगटले पक्षिप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:15 IST

सतरंजीपुऱ्यातून शनिवारी दुपारी ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कॉल आला. ‘मी सतरंजीपुऱ्यातून बोलतोय.’, असे ऐकताच सर्वांनी कान टवकारले. मात्र एका पक्ष्याला वाचविण्यासाठी तो कॉल असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, आणि पुढच्या क्षणी येथील पथक पक्ष्याला वाचविण्यासाठी निघाले !

ठळक मुद्देहॉस्टस्पॉट सतरंजीपुऱ्यातून ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरला केला फोन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सतरंजीपुरा सध्या शहरात कोरोनाचा हॉटस्पॉट झालायं. येथे जायला सारेच घाबरतात. येथून आलेला कॉल म्हणजे शासकीय यंत्रणेसाठी दक्षतेची घंटाच असते. याच सतरंजीपुऱ्यातून शनिवारी दुपारी ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कॉल आला. ‘मी सतरंजीपुऱ्यातून बोलतोय.’, असे ऐकताच सर्वांनी कान टवकारले. मात्र एका पक्ष्याला वाचविण्यासाठी तो कॉल असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, आणि पुढच्या क्षणी येथील पथक पक्ष्याला वाचविण्यासाठी निघाले !शनिवारी दुपारी आलेल्या या कॉलने आधी तर ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील सर्वांच्याच मनात धडकी भरली. एखादा प्राणी कोरोनाच्या सावटात आला की काय, अशीही शंका मनाला स्पर्शून गेली. मात्र कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस असून सतरंजीपुऱ्यामध्ये ड्युटीवर असल्याचे सांगितले. काही वेळापासून एक पक्षी झाडावरून पडला असून त्याला आम्ही बऱ्याच वेळापासून पहातोयं, कुण्या कुत्र्याने अथवा मांजरीने मारू नये म्हणून लक्ष देतोय. तुम्ही लवकर या आणि त्याला तुमच्या सेंटरमध्ये उपचारासाठी न्या, असे या पोलिसाने मोबाईलवरून पलिकडून सांगितले.सतरंजीपुरा आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला. अशा स्थितीत तिथून एका पक्ष्यासाठी पोलिसाचा आलेला कॉल ऐकून येथील पथक सरसावले. सतरंजीपुऱ्यातून कुठलाही प्राणी किंवा पक्षी आणणे म्हणजे स्टाफला थोडी भीती होतीच. पण भीतीवर कर्तव्याने मात केली. वनपाल सपना टेंभरे, येथील डॉक्टरांचा सहयोगी समीर नेवारे आणि चालक आशिष महल्ले त्याला आणायला पोहचले. त्यांनी पक्ष्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले आणि सेंटरमधील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी आणले. तिथे त्याला सिरिंजमधून पाणी आणि औषध देण्यात आले. आता त्याची प्रकृती सुधारत आहे. उन्हामुळे असे बरेच पक्षी उपचारासाठी येत असले तरी सतरंजीपुऱ्यातून आलेला हा ‘पेशंट’ येथील सर्वांच्या आठवणीत राहणारा ठरला आहे.