शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत बायोमेट्रिकचा कुठे वापर तर कुठे नकार; कोरोनासाठी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:12 IST

उपराजधानीत विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने अनेक केंद्रीय कार्यालयांनी आपापल्याकडील बायोमेट्रिक पद्धत काही दिवसांपुरती बंद ठेवली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कार्यालयात पंचिंंग बंदविभागीय, जिल्हाधिकारी, मनपा कार्यालय व बँकांमधील बायोमेट्रिक सुरुचकुठे सॅनिटायझरचा वापर, तर काही कार्यालयात उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. संपूर्ण यंत्रणा उपाययोजनांच्या कामाला लागली आहे. हा विषाणू संसर्गजन्य आहे. सध्या सर्वत्र बायोमेट्रिक हजेरी पद्धत अवलंबिली जाते. यात व्यक्तीच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. या माध्यमातूनही हा विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने अनेक केंद्रीय कार्यालयांनी आपापल्याकडील बायोमेट्रिक पद्धत काही दिवसांपुरती बंद ठेवली आहे. तर काहींनी उपाययोजना म्हणून बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. परंतु जिल्हा व विभागीय स्तरावरील प्रशासकीय कार्यालये मात्र यापासून अलिप्त आहेत. त्यांनी अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही किंवा यासंदर्भात कुठल्या सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये बायोमेट्रिक मशीनजवळील सॅनिटायझरचा उपयोग कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.

‘डीआरएम’ कार्यालयात बायोमेट्रिक बंद बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून बायोमेट्रिक मशीन ३१ मार्चपर्यंत बंद केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ कार्यालयात एकूण १२०० कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात आल्यानंतर हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक मशीनचा वापर करणे सक्तीचे आहे. परंतु नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून बायोमेट्रिक मशीन बंद केली आहे. कर्मचाºयांना आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ‘डीआरएम’ कार्यालयात लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन सील करण्यात आल्या आहेत. याच्या शेजारी ३१ मार्चपर्यंत बायोमेट्रिक मशीन बंद राहणार असल्याची सूचना दिली आहे. नागपुरात अनेक ठिकाणी बायोमेट्रिक मशीन सुरू असताना रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. कोरोना व्हायरस बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून पसरु शकतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस