शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर जैविक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:05 IST

रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी वापरलेले इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रात्री रेशीमबाग मैदानात गैरप्रकार सुरू असतात. या इंजेक्शनचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी झाला असावा, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देवापरलेले इंजेक्शन आढळले : ड्रग्ज घेण्यासाठी वापरल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी वापरलेले इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रात्री रेशीमबाग मैदानात गैरप्रकार सुरू असतात. या इंजेक्शनचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी झाला असावा, असे बोलले जात आहे.जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे पालन होणे आवश्यक असते. यासाठी महानगरपाालिकेने सर्व रुग्णालयांमधून बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी प्रत्येक खाटामागे विशिष्ट शुल्क आकारुन रुग्णालयातील ‘बायोमेडिकल वेस्ट’ उचलते. मात्र त्यानंतरही हा कचरा थोड्याअधिक प्रमाणात उघड्यावर दिसून येतो. शुक्रवारी सकाळी रेशीमबाग मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या मुलांना वापरलेले इंजेक्शन दिसल्याने ‘बायोमेडिकल वेस्ट’चा प्रश्न पुन्हा समोर आला. येथील खेळाडूंच्या मते, रात्री या मैदानावर गैरप्रकार सुरू असतो. यामुळे सकाळी दारूच्या फुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिकचे ग्लास, सिगारेटचे रिकामे पॅकेट्स जागोजागी पडलेले असतात. आता यात ‘बायोमेडिकल वेस्ट’चीही भर पडली आहे. ड्रग्ज घेण्यासाठी इंजेक्शनचा वापर होत असल्याचे येथील खेळाडूंचे म्हणणे होते.

 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न