शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वेकोलि, एसबीआय पदभरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड; तिघांना अटक, सूत्रधार पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 10:21 IST

या टोळीने नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली.

ठळक मुद्देसुसाईड नोटमुळे टोळीचा पर्दाफाश

नागपूर : वेकोली, एसबीआय आणि रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीने नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. या टोळीतील शिल्पा राजीव पालपर्ती, कुंदन कुमार उर्फ राहुल सिंग उर्फ रमेश शर्मा (३४, पाटणा), मोहम्मद दानिश झिशान आलम उर्फ रशीद अन्वर आलम (वय ३५, रा. पाटणा, सुलतानगंज) यांना अटक करण्यात आली आहे. परंतु अद्यापही मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही.

सोमवारी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विजय मगर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र निकम यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. सावनेर येथील खुरजगाव येथील सतीश प्रकाश आडे (३०) यांच्या तक्रारीनुसार २६ जुलै २०२१ रोजी आरोपी अमित कोवे, शिल्पा पालपर्ती आणि रमेश कामोने यांनी वेकोली किंवा एसबीआय बँकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नीची ११ लाख १७ हजारांनी फसवणूक केली.

आमिषाला विदर्भातील तरुण पडले बळी

केळवद पोलिसांनी १ जानेवारी २०२२ रोजी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सुरेंद्रगड येथील रहिवासी व आरोपी अमित कोवे याने जानेवारी २०२२ रोजी धंतोली येथील पत्रकार भवनाजवळ विष पिऊन आत्महत्या केली होती. मोबाइलचा तपास केला असता, त्याने नागपूर शहरासह ग्रामीण, गोंदिया, भंडारा, अमरावती, वर्धा येथील अनेक तरुणांकडून नोकरीसाठी लाखो रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच २०१९ पासून पाटणा येथील कुंदन व मोहम्मद दानिशला १ कोटी ३० लाखांची रक्कम दिल्याची माहितीदेखील समोर आली.

या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून सावनेर न्यायालयात हजर केले. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या दोघांविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे. तर आरोपी महिला शिल्पाविरुद्ध हुडकेश्वर, नांदेडमधील शिवाजीनगर आणि सांगलीतील मिरज पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मगर यांनी आरोपींना बळी पडलेल्या नागरिकांनी ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोवे होता सामाजिक कार्यकर्ता

या प्रकरणातील आरोपी कोवे याच्या व्हायरल झालेल्या सुसाईड नोटनुसार ही टोळी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना टार्गेट करून वेकोली, रेल्वे आणि एसबीआय बँकेत नोकरी मिळवून देण्याचे दावे करायची. या टोळीचे जाळे नागपूर, विदर्भासह पाटण्यापर्यंत पसरल्याची माहिती सुसाईड नोटमध्ये आढळून आली. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अमित कोवेला आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यादरम्यान, संबंधित टोळीने कोवेला त्यांच्यात समाविष्ट केले असल्याची चर्चा आहे. कोवेने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी रशीद आलम (५०), कुंदन कुमार उर्फ राहुल सिंग (४५) यांच्यासह कथित रेल्वे अधिकारी तिवारी (५५), खुराना (५०), शिल्पा पालपर्ती (४०), गडचिरोलीतील तुपट (४५), सकतेल (४५), नागपुरे (४५), कोचे (३५) यांची नावे नमूद केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी