शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बाईकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2024 00:15 IST

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बाईक चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या ...

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बाईक चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ही धडक एवढ्या जोरात झाली की मृतक दुचाकी चालकाच्या वाहनाचे मागील चाक तुटून वेगळे झाले.वसंत भुरसे (५६, रा. महाल) असे या अपघातातमृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर रितेश गांजापुरे (२१) असे आरोपी बाईकस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत भुरसे हे आपल्या दुचाकीने अभ्यंकरनगरकडून बजाजनगरकडे येत होते. डिव्हायडरजवळ ते वाहन वळवत असताना अभ्यंकरनगरकडून बजाजनगरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या रितेशने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

यात वसंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर बाईकस्वार रितेशही जखमी झाला. दोघांना बजाजनगर येथील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वसंत भुरसे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी आरोपी बाईकस्वार रितेशवर उपचार सुरु आहेत. बजाजनगरच्या महिला पोलिस उपनिरीक्षक बाबर यांनी आरोपी बाईक चालक रितेशविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू