शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:30 IST

कोरोना लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी आली आहे. महामारीच्या भीतीने मजूर स्वगृही परतले आहेत.

ठळक मुद्देनवीन प्रकल्प अडकल्याने कोट्यवधींचा फटकाप्रॉपर्टी विकण्यास अडचणी, मजूर स्वगृही

आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी आली आहे. महामारीच्या भीतीने मजूर स्वगृही परतले आहेत. तयार प्रॉपर्टी जसे फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्स आदींची विक्री थांबली आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान सहा महिने लागणार असल्याचे मत बिल्डरांनी व्यक्त केले आहे.क्रेडाई नागपूर मेट्रोचे उपाध्यक्ष विशाल अग्रवाल म्हणाले, नागपुरात जवळपास १५ हजार बंगले, फ्लॅट आणि दुकाने बनून तयार आहेत. लॉकडाऊनमुळे विकले जात नाहीत. जवळपास ७५ टक्के मजूर बांधकाम साईटवरून गावाकडे अथवा अन्य शहरात परत गेले आहेत. पूर्वीच मंदीच्या सावटात असलेले रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनामुळे आणखी मंदीत गेले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक दु:खाचे दिवस या क्षेत्राला पाहावे लागत आहे. त्यानंतरही बिल्डर्सला करात कुठलीही सवलत दिली जात नाही. कर्जाच्या ईएमआयवरील व्याज माफ करण्यात येत नाही. ईएमआय भरण्यासाठी बिल्डर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा गंभीर स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहे. २०२१ मध्ये स्थिती सामान्य होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मदतीसंदर्भात अजूनही स्पष्टता नाहीविशाल अग्रवाल म्हणाले, सरकारच्या लॉकडाऊनसंदर्भात नवीन गाईडलाईनमध्ये बांधकाम सुरू करण्यास सांगितले आहे. पण नागपूर रेड झोनमध्ये असल्याने मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शहराच्या सीमेत नव्याने बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली जात नाही. शहराच्या सीमेबाहेर बांधकामास परवानगी आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. यामध्ये ज्या साईटवर मजूर आहेत, त्यांनाच काम करण्याची परवानगी देण्यात येत आहे. तथापि, बांधकाम, कच्च्या मालाचा पुरवठा, मजुरांची उपलब्धता आदी संदर्भात लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे.गृहकर्जाचे दर आणि मुद्रांक शुल्क कमी व्हावेतक्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, लॉकडाऊनमुळे नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. यामुळे अनेक प्रकल्प अडकले आहेत. तर दुसरीकडे पूर्वीच प्रॉपर्टी विकल्या जात नसल्याने बिल्डर्सला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागत आहे. अशास्थितीत रिअल इस्टेट क्षेत्रासाठी समान डीसीआर लागू करण्याची गरज आहे. गृहकर्जाचे दर आणि मुद्रांक शुल्क कमी करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीवर इनपुट टॅक्स क्रेडिट वाढविण्याची मागणी आहे. असे झाल्यास लॉकडाऊन हटल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर स्थिती सामान्य होण्यासाठी सहा महिने लागतील.पीएम आवास योजनेपासून वंचितकोरोना लॉकडाऊनमुळे प्रॉपर्टीची खरेदी-विक्री होत नसल्याने लोकांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. अनेकांनी या योजनेंतर्गत सबसिडीचा लाभ घेऊन घर खरेदीचे नियोजन केले होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचे नियोजन फेल ठरले आहे. आता लॉकडाऊन हटल्यानंतर लोक घर खरेदी करतील वा नाही, यावरही संभ्रमाची स्थिती आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसReal Estateबांधकाम उद्योग