शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात बंदला मोठा प्रतिसाद; शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, वाहतूक सकाळपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 11:18 IST

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज राज्यात पुकारलेल्या बंदला विदर्भाच्या विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देकाही ठिकाणी आंदोलकांचा रस्ता रोकोअत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळलेमहिला आंदोलकही मोठ्या उत्साहाने मोर्चात सहभागीबंदमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आंदोलकांकडून जेवण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज राज्यात पुकारलेल्या बंदला विदर्भाच्या विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. वर्धा, यवतमाळ व नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्येही सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली आहे.नागपूर शहरात आंदोलकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. भगवे फेटे घातलेले शेकडो आंदोलक महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला माल्यार्पण करण्यासाठी जमले होते.यवतमाळ जिल्ह्यातील बोरी तुळजापूर मार्गावर सकाळी सात वाजल्यापासूनच आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मार्गावर अडकून पडलेल्या प्रवासी गाड्यातील प्रवासी व अन्य वाहन चालक-वाहकांना जेवणही आंदोलकांकडून पुरविले जात आहे. हा महामार्ग विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा मार्ग असल्याने येथे सकाळपासून बरीच वर्दळ असते. जिल्ह्यातील उमरखेड येथे सकाळपासूनच कडकडीत बंद पाळला जात आहे.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे बससेवा पूर्णपणे बंद होती. भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही सकाळपासून शुकशुकाट होता.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद