शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नागपुरातील सदर भागात वर्कशॉपला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:55 IST

सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली.

ठळक मुद्देएसी, फ्रीज, वॉशिंग मशीनसह लाखोंचा माल खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली.सदर भागात बहेराम पटेल आणि डोराब पटेल संचालित रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटर आहे. या ठिकाणी फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आदींची सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीची कामे केली जातात. दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आग वर्कशॉपमध्ये पसरली. फ्रीज, एसीमध्ये कुलिंगसाठी गॅसचा वापर केला जातो. आगीमुळे गॅस भरलेल्या क्रॉम्प्रेसरचे चार ते पाच स्फोट झाले. यामुळे संपूर्ण वर्क शॉप आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या १० गाड्या विविध स्थानकावरून घटनास्थळी पोहोचल्या. वर्कशॉपला टिनाचे शेड असल्याने पाण्याचा मारा करणे कठीण होत होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना चार तास मेहनत करावी लागली.आगीत एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मायक्रोवेव्ह, संगणक, वॉटर कूलर, डिफिटशन, वॉटर डीफ्रिशन, रिटेल शेफ, जनरेटर, फ्रीज आणि एसीचे स्पेअर पार्ट यासह दीड लाखाची रोख जळून खाक झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्यासह राजू दुबे, अनिल गोडे, नाखोड, कावळे, सुनील राऊत यासह इतर अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी होते. विशेष म्हणजे या वर्कशॉपला दोन वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती. त्यानंतरही आग नियंत्रणाची उपकरणे नव्हती.सुदैवाने मोठा अनर्थ टळलाविद्युत प्रवाह खंडित झाल्यास वीज पुरवठा करण्यासाठी वर्कशॉपमध्ये दोन डिझेल जनरेटर होते. या जनरेटरमध्ये तब्बल ४०० लिटर डिझेल होते. जनरेटरला आग लागली असती तर स्फोट होऊन परिसरातील दुकानांना मोठा धोका होता. यात प्राणहानी होण्याची शक्यता होती. परंतु अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.चर्चचे सदस्य मदतीला धावलेवर्कशॉपला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आर्च बिशप हाऊ सचे फादर आणि चर्चचे सर्व सदस्य मदतीसाठी धावून आले. आग आटोक्यात आणताना अग्निशमन विभागाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्याने चर्च उघडण्यात आले.तसेच चर्चचे टेरेस उपलब्ध करण्यात आले. यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्याला मदत झाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरfireआग