सायकलवरच ‘त्यांनी’ घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:49 AM2019-07-30T00:49:19+5:302019-07-30T00:50:26+5:30

लांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी सायकलिंगमधील झपाटलेले व्यक्तिमत्त्व. सायकलिंग हेच त्यांचे सर्वस्व होते. रविवारी सायकलिंग करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला.

On the bicycle, 'he' took his last breath | सायकलवरच ‘त्यांनी’ घेतला अखेरचा श्वास

सायकलवरच ‘त्यांनी’ घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext
ठळक मुद्देलांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी यांचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लांब पल्ल्याचे सायकलपटू बलराजसिंग सोखी सायकलिंगमधील झपाटलेले व्यक्तिमत्त्व. सायकलिंग हेच त्यांचे सर्वस्व होते. रविवारी सायकलिंग करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला.
बलराज यांना कोंढाळीनजीक सायकलिंग करीत असताना हृदयाघात झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे सायकलपटूंना जबर धक्काच बसला.
$^४६ वर्षांचे बलराज यांचे शारीरिक तंदुरुस्तीवर कमालीचे प्रेम होते. ते धावायचे, जिममध्ये तासन्तास घाम गाळायचे.
अनेक लांब पल्ल्याच्या सायकल रेसमध्ये त्यांचा सहभाग असायचा. हजारो किमी सायकल प्रवास कराणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती.
बलराज हे व्यावसायिक होते. रविवारी सकाळी त्यांनी डॉ. राजेंद्र रॉय आणि समीर लोही यांच्यासह कोंढाळीपर्यंत सायकलिंगची योजना आखली होती.
पहाटे ४ वाजता सर्वजण मोहिमेवर निघाले. तिन्ही सायकलपटू कोंढाळीला पोहोचले. सर्वांनी तेथे नाश्ता घेतला. नागपूरला परतीच्या प्रवासादरम्यान बलराज यांना अचानक भोवळ आल्याने ते कोसळले. मित्रांनी त्यांच्या शरीरात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. बलराज यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यांना वारंवार हृदयविकाराचे धक्के यायचे, हे नंतर मित्रांना कळले.
मित्रांच्या अथक प्रयत्नानंतरही बलराज त्यांना नेहमीसाठी सोडून निघून गेले होते.
लांब पल्ल्याचे रेसर...
बलराजसिंग सोखी यांच्या आकस्मिक मूत्यूचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अनेक सायकलपटूंनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विशेष असे की बलराज यांनी एकाच वर्षी २००,३००,४०० आणि ६०० किमी लांब सायकल शर्यत पूर्ण करीत अनेकांना आश्चर्यचकित केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक सायकलपटू हळहळत आहेत.

Web Title: On the bicycle, 'he' took his last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.