शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राचे चांदणे डोकावले बहिणींच्या घरी अन् साजरी झाली भाऊबीज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:02 IST

कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली.

ठळक मुद्देयमद्वितीयेला चंद्रकोरीसंगे बहिणींनी घातली भाऊरायांना ओवाळणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुतांश भारतीय सणांना पौराणिक इतिहास लाभला आहे. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण सुभद्रेकडे गेला आणि सुभद्रेने औक्षण करून कृष्णाचे पूजन केले तर, यमराजाने यमुनेकडे जाऊन तिला भेटवस्तू दिल्या आणि औक्षण करवून मनसोक्त भोजन केले, तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया. तेव्हापासून या दिवसाचे हे अत्यंत पवित्र महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली. 

रमा एकादशीपासून सुरू झालेला सहा दिवसाच्या दीपोत्सवाचा समारोप या दिवसाने होतो. लक्ष्मीपूजन आटोपताच दुसऱ्याच दिवशी बंधूंनी आपापल्या भगिनींकडे प्रयाण केले आणि मंगळवारी ओवाळून घेतले. यामागे बंधूरांयाचे आयुष्य वाढावे, त्याच्या आयुष्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये, त्याची भरभराट व्हावी अशी मनोमन प्रार्थना भगिनी करत असतात. त्याच अनुषंगाने लक्ष्मीपूजनानंतर बहीणभावांच्या या पवित्र क्षणांचा सोहळा साजरा करण्याची लगबग घरोघरी दिसून येत होती. मोठ्यांसोबतच लहानांनीही भाऊबीज साजरी करत हा सण पुढच्या पीढित हस्तांतरित करण्याची परंपरा जपली. अनेकांच्या घरी तर सोहळ्यागत हा सण साजरा झाला. तेलदिव्यांचा प्रेरक प्रकाश, विद्युत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा गजर आणि सुरेल गाण्यांची मैफिलही या निमित्ताने रंगल्याचे दिसून येत होते.   
          ज्या कुटूंबात आजही संयुक्त कुटूंबपद्धती जपली जात आहे, अशा घरी तर जणू कौटुंबिक मेळावाच भरला होता. जे कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्ताने वेगवेगळे एकल कुटुंब पद्धतीमध्ये स्थिरावले, ते सुद्धा मानाने मोठे असलेल्या भावांच्या-भगिनींच्या घरी जमले होते. ज्यांना भाऊ नाहीत, त्यांनी चंद्रालाच भाऊ मानत ओवाळणी घातली आणि याच कारणामुळे चंद्राला ‘चांदोबामामा’ का म्हणतात अशी माहिती घरातील चिमुकल्यांना दिली. विशेष म्हणजे, ऐन दिवाळीत पावसाचा जोर सुरू असताना आणि ढगांचा राबता असताना, भाऊबीजेला मात्र आकाश मोकळे झाले. जणू, वरुणराजाला आणि ढगांनाही बहीणभावांच्या नात्याचे अनुपम असे क्षण अनुभवयाचे असावे. त्यातच, काहींनी वृद्धाश्रम, अनाथाश्रमात जाऊन कुणी बहीण तर कुणी भाऊ शोधत हा सण साजरा केला. एकूण, दीपावलीचा हा भावनिक सोहळा उत्साहात साजरा झाला.

टॅग्स :Diwaliदिवाळीnagpurनागपूर