भाऊबीज दुपारी आणि रात्रीही साजरी करू शकतानागपूर : वसुबारसपासून दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते. परंतु खरी दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला होता. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे. लक्ष्मीपूजन निश्चित वेळेनुसार केल्यास ज्योतिष्यशास्त्रात शुभ मानले जाते. येणाऱ्या दिवाळीला रात्री ७.३० ते १०.४५ दरम्यान लक्ष्मीपूजन केल्यास शुभ राहील असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी अनुकूल काळ सकाळी ९.३० ते १०.४८ तर दुपारी ३.०५ ते ५.४६ आहे. हा दिवस धार्मिक कार्यांमध्ये व्यतित करणे योग्य ठरेल. कणकीचा दिवा लागून त्याचे तोंड दक्षिणेकडे करावे, यामुळे अपमृत्यू ठळतो. तांबूस व पांढऱ्या रंगाचा वापर दिलासजनक राहील. शंकराची उपासना ताण हलका करेल. महत्त्वाची कामे टाळणे योग्यच राहील, असा सल्ला वैद्य यांनी दिला आहे. १० नोव्हेंबर नरकचतुर्दशी हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी पहाटे ५.०६ वाजता सूर्यादय आहे. यावेळेस अभ्यंगस्नान करावे. रात्री ९.२० ला अमावस्याचा प्रारंभ असून, ११ नोव्हेंबरला रात्री ११.१४ ला अमावस्येची समाप्ती आहे. ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी काळसर व पिवळसर रंगछटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरेल. हा दिवस आर्थिक उलाढाली, धार्मिक बाबी व दानधर्मासाठी अनुकूल राहील. पांडुरंगाची उपासना, लक्ष्मी-विष्णूची उपासना तसेच कुबेराचे पूजन करतात. लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५ आहे. १२ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा दिवस सर्वच राशीच्या लोकांना अनुकूल अहे. श्रीदत्तात्रय व अग्निउपासना लाभकारी राहील. भाऊबीज शुक्रवारी १३ नोव्हेंबरला आहे. हा दिवस अतिशय मंगलकारी आहे. काळसर व फिकट निळा रंगछटांचा वापर उपकारक ठरेल. भाऊबीजेसाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १२.१५ ते १.३५ व रात्री ९.५ ते १०.३५ आहे. (प्रतिनिधी)
लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५
By admin | Updated: November 8, 2015 02:59 IST