शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे ‘बेस्ट इनोव्हेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:21 IST

नागपूर महापालिकेच्या ‘स्मार्ट’ वाटचालीला स्वच्छता सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.

नागपूर महापालिकेच्या ‘स्मार्ट’ वाटचालीला स्वच्छता सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. मनपाने राबविलेल्या ‘जीपीएस घड्याळा’च्या अभिनव उपक्रमाला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस’चा हा सन्मान ठरला आहे. देशपातळीवर झालेला हा गौरव नागपूरकरांचे आणि मनपाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे यश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला महापालिकेने राबविलेला हा उपक्रम अतिशय आवडला. तत्कालीन मनपा आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस घड्याळां’चा उपक्रम राबविला होता. याशिवाय याच स्वच्छतेच्या उपक्रमांतर्गत उपराजधानीतील ५० हजारांच्या जवळपास नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले होते. ‘डोअर टू डोअर’ कचरा गोळा करण्यापासून तर रेल्वे, बस स्टॅँडपर्यंतची स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली होती. नागपूरची वाटचाल आता स्मार्ट दिशेने होत आहे. सिमेंट रोडचे चकाचक रस्ते, स्मार्ट दुभाजक, दुभाजकांचे सौंदर्यीकरण, एलईडी लाईट, स्मार्ट बसस्टॉप असे बदल होत आहेत. स्मार्ट शहराच्या दृष्टीने सर्वच उपाययोजनांवर भर दिला जात आहे. मागील स्वच्छता सर्वेक्षणात मनपाने पिछाडी घेतल्यानंतर यावेळी काहीतरी ‘इनोव्हेशन’ करण्याची संकल्पना पुढे आली आणि ‘जीपीएस घड्याळां’चा हा उपक्रम यशस्वी ठरला. इतर बाबतीतही नागपूरचे प्रदर्शन चांगले राहिले. यंदा स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली नाही. वेगवेगळ्या कॅटेगरीत पारितोषिकांची घोषणा झाली आहे. तब्बल ४२०३ शहरांमध्ये ही स्पर्धा होती. गेल्या वर्षी नागपूर मनपाला २००० गुणांपेकी ११५९ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ५७.९५ टक्के इतकी होती. कचºयाचे कलेक्शन आणि वाहतुकीत नागपूरला ३६० पैकी २९३ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ही ८१.३९ इतकी होती. केवळ पारितोषिकापुरते मर्यादित न राहता स्वच्छतेच्या दृष्टीने नागपूर मनपाला आणखी भरीव कार्य करण्याची गरज आहे. शहरातील अनेक भागात अजूनही अस्वच्छता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने नागपूरची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या संकल्पनांना यशस्वीपणे राबविण्याची व शहर कायमस्वरुपी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, मनपातील सत्ताधारी व विशेषत: नागपूरकरांनी घ्यायला हवी.

टॅग्स :nagpurनागपूर