लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून गरजू महिलांना आर्थिक आधार देण्याचा उद्देश असताना, चिमूर तालुक्यातील एका महिलेला प्रशासनिक चुकीचा फटका बसला आहे. रेखा महेंद्र बारसागडे (३५, रा. किटाडी तुकूम, ता. चिमूर) या महिलेला शासकीय नोंदीत मृत दाखविणे तिचे हक्काचे अनुदान थांबविण्यात आले. या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून रेखा बारसागडे यांच्या बैंक खात्यात नियमितपणे अनुदान जमा होत होते. मात्र, ऑक्टोबर २०२५ पासून अचानक अनुदान जमा होणे थांबले. सुरुवातीला केवायसीअभावी अडचण असावी, असा अंदाज घेत लाभार्थी महिलेने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. तरीही अनुदान जमा न झाल्याने बँक व महिला-बालकल्याण कार्यालयात चौकशी केली.
समोर आलेल्या वास्तवाने तिला जोरदार धक्का बसला. महिला व बालकल्याण विभागाच्या लाडकी बहीण पोर्टलवर रेखा महेंद्र बरसागडे यांची मृत अशी नोंद आहे. प्रत्यक्षात ही महिला हयात असून कुटुंबासह जीवन जगत आहे. मात्र, केवळ एका चुकीच्या नोंदीमुळे योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे. संबंधित प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे कुटूंबाचे लक्ष लागले आहे.
कुटुंबीयांना मनस्ताप
जिवंत लाभार्थीला मृत घोषित करण्याइतकी गंभीर चूक नेमकी कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाली, याबाबत प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. डेटा नोंदणी, पडताळणी आणि अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, लाडकी बहीण योजनेचा लाभ तात्काळ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी लाभार्थी रेखा बरसागडे यांनी केली आहे.
"मी जिवंत आहे. पण, सरकारी कागदपत्रांमध्ये मला मृत केले. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा"- रेखा महेंद्र बारसागडे, किटाडी (तुकूम) ता. चिमूर
Web Summary : A woman from Chimur, Maharashtra, was wrongly declared dead in government records, halting her 'Ladki Bahin' scheme benefits. Despite being alive and completing KYC, the error persists, causing distress. She demands investigation and restoration of benefits.
Web Summary : महाराष्ट्र के चिमूर की एक महिला को सरकारी रिकॉर्ड में गलत तरीके से मृत घोषित कर दिया गया, जिससे उसकी 'लाडली बहिन' योजना के लाभ रुक गए। जीवित होने और केवाईसी पूरा करने के बावजूद, त्रुटि बनी हुई है, जिससे संकट पैदा हो गया है। वह जांच और लाभों की बहाली की मांग करती है।