शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरा पाठोपाठ प्रेयसीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 19:16 IST

प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील पिपरिया येथील घटना : गळफास लावून संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवलापार : प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरिया येथे गुरुवारी (दि. १६) रात्री घडली.अतुल भोजराज कोहळे (२२) व निकिता शेषराव गजभिये (२१) दोघेही रा. पिपरिया, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. दोघेही एकाच गावाचे रहिवासी असल्याने त्यांची आपसात ओळख होती. त्यांच्या याच ओळखीचे मैत्री आणि पुढे प्रेमात रुपांतर झाले. मात्र, त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत गावात कुणाला फारशी माहिती नव्हती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.दरम्यान, अतुल गुरुवारी (दि. ९) रात्री १० वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याचवेळी आत्महत्या करीत असल्याचे त्याने निकिताला फोनवर सांगितले. तो याआधी बरेचदा अशाप्रकारचे बोलल्याने तिने मनावर घेतले नाही. मात्र, त्याने त्या रात्री गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. वन विभागात नोकरीला असलेल्या व्यक्तीला तो लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि बातमी गावात पसरली.या घटनेमुळे निकिता अस्वस्थ झाली होती. शुक्रवारी (दि. १०) अतुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुसरीकडे निकिताची प्रकृती खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला लगेच रामटेक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मंगळवारी (दि. १४) सुटी झाल्याने तिला कुटुंबीयांनी घरी आणले. त्यातच दोन दिवस घडलेल्या घडामोडीमुळे वडिलांनी तिच्याजवळ ‘तुझ्यामुळे पोलीस ठाण्यात जावे लागत आहे’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.त्यातच तिने गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरातील मंडळी बाहेर असल्याचे पाहून खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर