शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:40 AM

राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. रामनगरस्थित श्री शक्तीपीठ येथे सुरू झालेला हा वर्ग १८ जूनपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्दे अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते उद्घाटनदेशभरातील २० प्रांतांमधून ६० सेविका आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. रामनगरस्थित श्री शक्तीपीठ येथे सुरू झालेला हा वर्ग १८ जूनपर्यंत चालणार आहे.समाजातील वातावरण गढूळ होत असून याला स्वच्छ करण्यासाठी सेविकांनी प्रशिक्षित होऊन सज्ज होणे गरजेचे आहे. १९३८ सालापासून समितीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्याची पद्धत सुरु झाली असून गेली ८० वर्षे हे वर्ग निरंतर होतं आहेत,असेही अन्नदानम् यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असतो. कितीही प्रलोभन समोर आले तरीही मी माझी मातृभूमी सोडून कधीच जाणार नाही, असा निश्चय केला असल्याचे मत धनश्री लेकुरवाळेने व्यक्त केले. यावेळी वर्गाधिकारी अंबिका नागभूषण यादेखील उपस्थित होत्या. या प्रशिक्षण वर्गाला देशभरातील २० प्रांतांमधून ६० सेविका आल्या आहेत.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर