शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं...

By नरेश डोंगरे | Updated: June 19, 2023 22:27 IST

उत्तर नागपुरात एकाच आठवड्यात दोन अशा घटना उजेडात आल्या की या घटनेतील पात्र असलेल्या मुलींनी दुसऱ्या प्रांतात पळून जाऊन घरसंसार थाटल्यानंतरच त्यांच्या पालकांना आपल्या 'लाडली'ची 'इन्स्टा-लव्ह-स्टोरी' कळली

नागपूर : सुपरस्टार अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर आणि परवीन बॉबी, अशी त्यावेळीची तगडी स्टारकास्ट असलेला ‘सुहाग’ हा चित्रपट १९७९ ला झळकला. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील 'तेरी रब ने बना दी जोडी... हो तेरी रबने -'... हे गीत त्यावेळी खूप गाजले. अनेकदा या गाण्याचा रेफरन्स लग्न जुळवल्यावर दिला जातो. मात्र, सध्या डिजिटल युग असून या काळात अनेक कामे, व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात. अगदी विदेशात बसलेली बहीण आपल्या भावाला ऑनलाइन पद्धतीने राखी बांधते अन् पूजापाठही ऑनलाइन पद्धतीने करवून घेतली जाते. आजची युवा पिढी आता त्यांचे जोडीदार (लाइफ पार्टनर)सुद्धा फेसबूक, इन्स्टावरच निवडते. हे करताना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, वाढवले, त्यांना त्यांच्या निर्णयाची साधी चाहूलही लागू देत नाही.

उत्तर नागपुरात एकाच आठवड्यात दोन अशा घटना उजेडात आल्या की या घटनेतील पात्र असलेल्या मुलींनी दुसऱ्या प्रांतात पळून जाऊन घरसंसार थाटल्यानंतरच त्यांच्या पालकांना आपल्या 'लाडली'ची 'इन्स्टा-लव्ह-स्टोरी' कळली. नंतर उघड झालेल्या घटनाक्रमाने त्यांना आकाशातून खाली फेकावे तसे झाले.

प्रकरण : एक

तारुण्यात आलेली लाडकी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई-वडील, काका-मामा सारेच हादरले. कुणी पळवले असेल, कुठे पळवले असेल, ती सध्या काय करत असेल, कुण्या स्थितीत असेल. तिचे काही बरेवाईट तर झाले नसेल, अशा अनेक शंका-कुशंकांनी जन्मदात्यांचा जीव टांगणीला लागला. तक्रार झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पालकांच्या मदतीने पोलिस त्या मुलीचा शोध घेऊ लागले. तिचा मोबाइलही संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. अखेर तिचे इन्स्टा अकाउंट तपासल्यानंतर धागा मिळाला. ती उज्जैन (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील तरुणाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तेथे पोहोचले. तिने मात्र पोलिसांच्या हातावर आपले लग्नाचे फोटो, मॅरेज सर्टिफिकेट ठेवून नागपूरला परत येण्यास नकार दिला. येथे आपण सुखी आहोत. परत नेण्यासाठी जोरजबराई केल्यास परिणाम चांगला होणार नाही, असा निरोपही आई-वडिलांना देण्यासही सांगितले. तिचा तेथील पोलिस ठाण्यात तयार करण्यात आलेला तिच्या निरोपाचा व्हिडीओ पाहून आई-वडील आणि अन्य नातेवाइकांची जी स्थिती झाली, ती शब्दबद्ध करणे कठीण आहे.

प्रकरण : दोनया प्रकरणातील मुलगी सधन कुटुंबातील असून केवळ १६ वर्षांची आहे. ती अचानक बेपत्ता झाली तेव्हा तिच्या आई-वडील अन् आजीच्या काळजाचे ठोकेच चुकले. काही दिवसांनंतर ती दिल्लीला एका झोपडपट्टीत सापडली. गरीब, हाडकुळ्या, बेरोजगार तरुणासोबत इन्स्टावर ओळख झाल्यानंतर ती येथून पळून गेली अन् तिकडे लग्न केले. पोलिस अन् नातेवाईक तेथे पोहोचल्यानंतर ती काही केल्या येथे यायला तयार नव्हती. मात्र, कायद्यामुळे ती विवश होती. अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारीवरून तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी नागपुरात आणले. अपहरणासोबतच प्रियकर आता बलात्काराचा आरोपी बनणार असल्याचे लक्षात आल्याने ती 'आऊट ऑफ कंट्रोल' झाली अन् त्याच्यावर कारवाई केली तर याद राखा, अशी धमकीच तिने पालकांना दिली. वैद्यकीय तपासणीलाही स्पष्ट नकार दिला. येथे पालकांसोबत पोलिसही हतबल झाले अन् त्या तरुणाची जामिनावर सुटका झाली. तो एवढा गरीब की दिल्लीला परत जातानाचे रेल्वेचे तिकीटही पोलिसांनी त्याला आपल्या पैशाने काढून द्यावे लागले.