शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वी अन् लग्नानंतरही ‘बॉस’ने केली तिच्याशी दगाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 21:14 IST

Nagpur News लग्नाआधी आणि लग्नानंतर बॉसने एका महिलेवर अत्याचार केल्याने तिने सरळ पोलीस ठाणे गाठले व त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देनवऱ्याकडून परत बोलविले शारीरिक शोषण केल्यानंतर झिडकारले

नागपूर - लग्नाच्या आणाभाका घेत ‘बॉस’ने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले, नंतर मात्र तिला वाऱ्यावर सोडले. तिने कसेबसे सावरत दुसऱ्याशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही दिवसातच बॉसचे प्रेम जागे झाले. तुझ्याविना जगू शकत नाही, असे म्हणत त्याने तिला नवऱ्यापासून दूर केले. आता अनेक दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काढल्यानंतर त्याने परत तिला झिडकारले. एखाद्या टीव्ही सिरियलसारखी बदलणारी ही रियल स्टोरी हुडकेश्वरमधील एका महिलेच्या वाट्याला आली. त्यामुळे तिने आता पोलिसांकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

फिर्यादी महिला २९ वर्षांची आहे. आरोपी प्रतीक लांडगे (वय २८, रा. मोर्शी, जि. अमरावती) आणि ती एका कंपनीत काम करायची. तो ‘बॉस’ म्हणून मिरवायचा. चार वर्षांपूर्वी त्यांचे सूत जुळले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेऊन सर्व मर्यादा सोडल्या. १० नोव्हेंबर २०१८ नंतर ते पती-पत्नीसारखे बाहेर खाणे-पिणे, शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. गेल्या वर्षी त्यांच्यात कटुता आली. त्याने लग्नास नकार दिल्याने त्यांचे ब्रेकअप झाले. तिने दुसऱ्या तरुणाशी लग्न करून संसार थाटला. त्यानंतर मात्र प्रतीक अस्वस्थ झाला. तुझ्याविना जगू शकत नाही, असे म्हणत त्याने तिला परत येण्यास सांगितले. तिनेही नवऱ्याशी काडीमोड न घेताच प्रियकराचे घर गाठले. पुन्हा त्यांचे नवरा-बायकोसारखे वर्तन सुरू झाले. १३ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांच्यातील गोडीगुलाबी कायम होती, नंतर परत खटके उडणे सुरू झाले. तिने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने स्पष्ट नकार दिला. त्याने दुसऱ्यांदा वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केल्याने महिला थेट हुडकेश्वर ठाण्यात पोहोचली. तिने प्रतीकविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. पोलिसांनी त्यावरून गुन्हा दाखल केला.

साथीदारांकडूनही धमकी

आरोपीने शारीरिक शोषण करतानाच जीवे मारण्याची धमकी तिला दिली. प्रतीकचे तीन साथीदारसुद्धा आपल्याला धमक्या देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. त्यामुळे ठाणेदार कविता इसारकर यांनी बलात्कार करून धमकी दिल्याच्या आरोपाविरुद्ध प्रतीक आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस सांगत आहेत.

----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी