शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याचे कागदपत्र देऊन बनला सैनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:53 IST

दुसऱ्याचे कागदपत्र देऊन एक युवक सैन्यात भरती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षणादरम्यान झाला खुलासा : कामठीत गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दुसऱ्याचे कागदपत्र देऊन एक युवक सैन्यात भरती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.मनोज दिनेश सालोदरी (२१) रा. भदरोली, उत्तर प्रदेश याच्या नावावर अज्ञात युवकाने कामठीच्या ओसीजेसी ट्रेनिंग कंपनीत सैन्यात भरतीसाठी अर्ज सादर केला होता. त्याची सैनिक म्हणून निवडही झाली होती. त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. त्याला प्रशिक्षण कालावधीतील वेतनही मिळू लागले. दरम्यान सेनेने आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरू केला. सैन्याचे पथक कागदपत्रांच्या आधारे उत्तर प्रदेशात पोहोचले. त्यांनी मनोज सालोदरीबाबत चौकशी सुरू केली. त्याच्या घरी पोहोचून सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथे पथकाला सालोदरी भेटला. त्याने सैन्यात भरती झाल्याच्या बाबीचा इन्कार केला. मनोज सालोदरीने आपले शैक्षणिक तसेच इतर कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती दिली. सैन्य दलाच्या पथकाने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपी युवकाची चौकशी सुरू केली. त्याला ताब्यात घेण्याची तयारी केली. त्याची माहिती मिळताच आरोपी ३० सप्टेंबरला दुपारी प्रशिक्षण केंद्रातून पळून गेला. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे सूरजभान मानसिंह यांनी कामठी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवकाला सैन्याशी निगडित पार्श्वभूमीचा असल्यामुळे त्याने लेखी आणि शारीरिक परीक्षा सहज उत्तीर्ण केल्याचा संशय आहे. पोलीस आणि सैन्यातर्फे त्याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी