शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा  : शैलेश बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 20:24 IST

अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा पंधरवड्याला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अभियानाचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहरचे शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीणचे श्रीपाद वाडेकर आदी उपस्थित होते.शैलेश बलकवडे म्हणाले, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळेच अपघात वाढले आहेत. यामुळे वाहतूक सुरक्षेला घेऊन प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग महत्त्वाचा आहे, तरच अपघात कमी होतील. शिवाजी बोडखे यांनी यावेळी प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे याची मीमांसा करून वाहनधारकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली तर वाहतूक पोलिसांची गरज भासणार नाही, अपघाताला आळा बसेल, असेही ते म्हणाले. सुधाकर तेलंग यांनी अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रम, आरोग्य शिबिर व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. संचालन मार्तंड नेवासकर यांनी केले तर आभार पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सामाजिक कार्यकर्ता व स्वातंत्र्य संग्राम सेनानी शंकरराव लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जीवन सुरक्षाचे राजीव वाघ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध देशपांडे, राजवर्धन करपे, अनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहड आदी उपस्थित होते.चित्र प्रदर्शनाचे कौतुकरस्ता सुरक्षा या विषयाला घेऊन शहर आरटीओ कार्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात ८० चित्रांचा समावेश असून हेल्मेटपासून ते सीटबेल्ट, हेडफोन, अमली पदार्थांचे व्यसन व वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर प्रकाश टाकला. सर्वच चित्रे सुंदर रेखाटली असून प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन करण्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे व विनोद जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर