शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे बना : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 8:39 PM

युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापन याच बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे असून रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे बना, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देयूथ एम्पॉवरमेंट समिटला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापन याच बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे असून रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे बना, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

फॉर्च्युन फाऊंडेशन, सूक्ष्म लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या यूथ एम्पॉवरमेंट समिट या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सिव्हील लाईन्स येथील आमदार निवास परिसरात आयोजित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या समिटचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. गडकरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ.अनिल सोले, नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर संदीप जोशी, खा. डॉ. विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती, आ. रामदास आंबटकर, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, संदीप जाधव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर विलास पराते प्रामुख्याने पस्थित होते.नागपुरातील मिहान प्रकल्पामध्ये आतापर्यंत हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून मदर डेअरी सारख्या प्रकल्पामधून स्वयंरोजगार मिळत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. रोजगाराच्या संदर्भातील मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांसोबत समन्वय संवाद आणि सहकार्य या युवा समिटद्वारे होत असल्याचे त्यांनी सांगितले.कौशल्यप्राप्त युवकांना रोजगाराची पुष्कळ संधी - देवेंद्र फडणवीसराज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र्र फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय तसेच हॉस्पिटॅलिटी या सेवा क्षेत्रामध्ये अमाप संधी उपलब्ध असून तांत्रिक शिक्षण घेणाºया युवकांना रोजगाराच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहे ,असे नमूद केले. उद्योगांना रोजगारक्षम युवा मिळत नाही तर युवकांना अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही अशा दोन्ही घटकांना या युवा समिट परिषदेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले. विदर्भामध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या संधी उपलब्ध होत असून युवकांनी त्यांचा सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यंदा ४८०० जणांची थेट नियुक्ती - अनिल सोलेफॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष व या परिषदेचे संयोजक प्रा. अनिल सोले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, या समिटच्या माध्यमातून गेल्या वर्षी ६ हजार तरुणांना रोजगार मिळाला. त्यांची नावे येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. यंदाच्या यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये ६० च्यावर कंपन्या आल्या असून त्यात ४८०० जणांची थेट भरती होणार आहे. आमदार निवासच्या १०० खोल्यांमध्ये या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत व यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापक सुद्धा येथे दाखल झाले आहेत.ग्रामीण भागासाठी स्वतंत्र रोजगार मेळावा घ्यायावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढच्या वर्षीपासून ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करावा, अशी सूचना केली. ते म्हणाले, आपल्या देशात गरिबी व भूकबळी ही मोठी समस्या आहे. या दोन्ही समस्या बेरोजगारीमुळे आहेत. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची गरज आहे. तेव्हा पुढच्या वर्षीपासून ग्रामीण भागात स्वतंत्रपणे रोजगाराचा कार्यक्रम घ्यावा.सेल्फ राईट राईड या नव्या स्टार्टअपची सुरुवातयावेळी सेल्फ राईट राईड या नव्या स्टार्टअपची सुरुवात नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यासोबतच खेलो इंडियाच्या प्रथम आयोजनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर गेल्या वर्षी या उपक्रमात महाराष्ट्रातील खेळाडूंनी मिळविलेली सर्वाधिक पदके देवेंद्र फडणवीस यांना राणी द्विवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी वृक्षदिंडी आणि यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या सीडीचे लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरी