शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:45 IST

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील पाचपावलीत थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.आरोपी रितिकचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. ती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पाठलाग करून तिच्याशी सलगी साधण्याचे त्याने अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. उलट त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे तो सायको बनला. दारूच्या नशेत रितिक नेहमी उलटसुलट प्रकार करतो. सोमवारी रात्री १० च्या सुमारास त्याने हातात चाकू घेऊन तांडापेठ परिसरात गोंधळ घालणे सुरू केले. त्याची समजूत काढायला आलेल्या राजू गोविंदराव नंदनवार, जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (वय ४२), रमेश श्रावण निघारे (वय ५०), प्रतिश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेखावत अंसारी (वय ३५) या पाच जणांवर एका पाठोपाठ चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वस्तीतील लोकांनी एकत्र होऊन आरोपी रितिकला पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. आरोपी रितिकला प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.गणेशपेठ पोलिसांचा हलगर्जीपणाआरोपी रितिक आधीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीनेही दोन वेळा गणेशपेठ ठाण्यात रितिकविरुद्ध तक्रार नोंदवली. मात्र, तेथील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र (एनसी) नोंद करून रितिकला सोडून दिले. त्यामुळेच सोमवारी रात्रीचा थरार घडला. गणेशपेठ पोलिसांनी त्याला अटक करून आतमध्ये डांबले असते तर हा प्रकारच घडला नसता, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट