शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:05 IST

मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : ‘भाषा, अभिजातता आणि आपण’वर परिसंवाद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, धरमपेठ राजाराम वाचनालय आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्वोदय आश्रम सभागृहात आयोजित ‘भाषा, अभिजातता आणि आपण’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी प्रा. वसंत आबाजी डहाके तर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. शांताराम दातार, नागेश चौधरी, वसंत त्रिपाठी व डॉ. प्रकाश परब उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, उद्या विदर्भ वेगळा झाला तर या राज्याची राज्यभाषा कोणती राहील इतका संभ्रम आहे. कारण, भाषेची भेसळच मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठीचे अभिजातत्व जपायचे असेल तर मराठी सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासोबतच ती घराघरात आत्मियतेने बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. वसंत त्रिपाठी म्हणाले, कुठल्याही एका भाषेच्या विकासाचा अट्टहास अयोग्य आहे. प्रत्येक भाषेची आपली एक विशेषत: असते. डॉ. प्रकाश परब म्हणाले, शासन आणि समाज दोघांनी मिळून भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी झटले पाहिजे. मुख्यत्चे मराठी भाषेचे प्राध्यापक आणि पत्रकार यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. शांताराम दातार यांनी न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागेश चौधरी यांनी प्रमाण भाषेचा आग्रह हा आदिवासी, गोंड आदी जमातींसाठी घातक असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून भाषा, अभिजातता आणि आपण या तिन्हीचा आढावा घेतला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर