खापरखेडा : जुन्या वादातून भांडण करीत आराेपीने एकास मारहाण करून गंभीर जखमी केले. यात पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या चिचाेली बाबुलखेडा येथे बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
गणेश आत्माराम धुर्वे रा. चिचाेली, बाबुलखेडा, असे जखमीचे नाव असून, अंकित धर्मेंद्र कापसे (२५, रा. चिचाेली, बाबुलखेडा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी गणेश व त्यांचा मुलगा विक्की गणेश धुर्वे यांच्यासाेबत भांडण केले. दरम्यान, आराेपीने लालमातीच्या कवेलूने मारहाण करीत फिर्यादीला गंभीर जखमी केले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२६, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार मेश्राम करीत आहेत.