कळमेश्वर : उधार दिलेली रक्कम परत मागितल्याने महिलेने एकास वीट फेकून मारली. त्यात ताे जखमी झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेराड येथे घडली.
आशिष गंगाप्रसाद मिश्रा (३९, रा. घाेराड, ता. कळमेश्वर) असे जखमीचे नाव आहे. आशिषने त्याच्या गावातील ओळखीच्या महिलेला रक्कम उधार दिली हाेती. काही दिवसांनी त्याने तिला रक्कम परत मागितली. त्यामुळे चिडलेल्या महिलेने कशाचे पैसे म्हणत त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यातच त्या महिलेने खाली पडलेली वीट उचलून त्याच्या दिशेने भिरकावली. त्यामुळे आशिषच्या उजव्या डाेळ्याजवळ जखम झाली. त्याच्यावर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक फाैजदार राजेश वानखेडे करीत आहेत.