शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संवाद ; प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 10:47 IST

plasma corona Nagpur News कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे प्लाझ्मा दान करून इतरांचा जीव वाचवावा, असे आवाहनडॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले आहे.

ठळक मुद्देडॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविडसाठी प्रभावी औषध वा लस अद्यापही उपलब्ध नाही. मात्र प्लाझ्मा हा एक महत्वाचा पर्याय आहे. ‘आरबीडी’ (रिसेप्टर बॉयडिंग डोमेन) प्लाझ्मा ही प्रगत उपचार पद्धती आहे. त्याचे परिणामही उत्तम दिसून आले आहे. प्लाझ्माद्वारे पेशींची प्रतिकारशक्ती वाढवून विषाणूला बाहेरच थांबविले जाते. त्यामुळे व्हायरस तिथेच मृत होतो. ही उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे प्लाझ्मा दान करून इतरांचा जीव वाचवावा, असे आवाहन मेडिकल संचालक, आरबीडी प्लाझ्मा बँक, लाईफलाईन रक्तपेढीचे डॉ. हरीश वरभे आणि प्रभारी क्रिटिकल केअर फिजिशियन, कोविड युनिट भवानी हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी 'कोविड प्लाझ्मा दान आणि आरबीडी-प्लाझ्मा उपचार' या मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना बाधितांसाठी प्लाझ्मा हे वरदान आहे. मागील १०० वर्षांपासून प्लाझ्माचा महामारीमध्ये उपयोग केला जात आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने चार मुख्य घटक असतात. श्वेत रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स), तांबड्या रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) आणि रक्तद्रव (प्लाझ्मा) प्लाझ्मा दात्यांच्या शरीरातून रक्त देतेवेळी अद्ययावत उपकरणाद्वारे केवळ प्लाझ्माच घेतला जातो. यामध्ये प्लाझ्मा दात्याला कोणताही धोका नाही. प्लाझ्मा दान केल्याने आणखी जास्त अशक्तपणा येतो, प्रतिकारशक्ती कमी होते हे सर्व गैरसमज आहेत.प्लाझ्मा दान शिबिर राबवादात्याच्या शरीरातून ४०० मिली प्लाझ्मा घेतला जातो आणि विशेष म्हणजे त्यातून दोन लोकांचा जीव वाचविता येतो. कोविड रुग्णाला जेवढ्या लवकर प्लाझ्मा दिला जाईल तेवढी जास्त रुग्ण बरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मा दान शिबिर राबविणेही अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोविडमधून बरे झालेल्यांसह सर्वांनीच पुढे यावे, असे आवाहन हरीश वरभे आणि कौस्तुभ उपाध्ये यांनी केले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस