शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळ, तुळस, कडुलिंब रात्रीही सोडतात ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:16 IST

Environment, Trees, Oxygen पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ आणि काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.

ठळक मुद्देकाही झाडांमध्ये अधिक क्षमतावातावरणातील विषारी वायू शोषणाचेही गुणधर्म

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्री झाडाखाली झोपू नये असे म्हणतात कारण झाडे रात्री कॉर्बन डायऑक्साईड सोडतात. मात्र गौतम बुद्ध अनेक वर्षे पिंपळाच्या झाडाखाली कसे बसले, हा प्रश्न पडतो. ते बसू शकले कारण पिंपळ वृक्ष रात्रीसुद्धा प्राणवायू सोडतो. पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ आणि घरासमोरील कुंड्यामध्ये ठेवलेल्या काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे यांनी अशा विविध झाडांची अभ्यासपूर्ण नोंद ठेवली आहे. आपल्या संस्कृतीत तुळशीला कित्येक शतकांपासून महत्त्व आहे ते याचमुळे. कडुलिंबामध्येही औषधी गुणधर्म आहेत. याशिवाय अ‍ॅलोवेरा, कृ ष्णकमळ, अ‍ॅरिका पॉम यांच्यासह कुंड्यात वाढणारे मनी प्लॅन्ट, साप घरात येऊ नये म्हणून लावले जाणारे स्रेक प्लॅन्ट, रबर प्लॅन्ट, जरबेरा, स्पायडर प्लॅन्ट, लॅव्हेंडर, कुंडीतील बांबू प्लॅन्ट, पीस लिली, ड्रासेना, आर्किड, जास्मीन आदी झाडांचा समावेश आहे. फोटोसिन्थेसीस प्रक्रियेद्वारे दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषून आपले अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. रात्री श्वासोच्छ्वास करताना मात्र ऑक्सिजन घेऊन कार्बन सोडतात. मात्र वर उल्लेखिलेली झाडे रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतात किंवा त्यांच्यात प्राणवायू सोडण्याची क्षमता अधिक असते. वाळवंटात पाण्याची कमतरता असलेल्या भागातील वृक्षांमध्येही हा गुणधर्म आढळून येत असल्याचे डॉ. उगेमुगे यांनी सांगितले.

रात्री प्राणवायू सोडण्याच्या क्षमतेबाबत वैज्ञानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र या वनस्पती अतिशय लाभदायक आहेत. वातावरणातील विषारी वायू शोषण्याचा गुणधर्म त्यांच्यात आहे. शिवाय प्राणवायू सोडत असल्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यासही लाभदायक आहेत.- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषण