शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा संमेलनापूर्वी ‘अभिजात’बाबत कृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 15:49 IST

बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पत्र : सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकसंध होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास व पंतप्रधानांनी अविलंब मराठीला अभिजात दर्जा दिल्यास केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आम्हाला येत्या साहित्य संमेलनात मांडता येईल, असेही जोशींनी या पत्रात नमूद केले आहे. विनंत्या, आर्जव खूपदा करून झालेत. परंतु अद्याप काही या विषयावर तोडगा निघाला नाही. मागच्या वर्षी डोंबिवलीत पार पडलेल्या संमेलनातही मुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करण्यात आली होती. परंतु वर्ष लोटले पुढे काहीच झाले नाही. यंदाचे संमेलन पंतप्रधानांच्या गृहराज्यात होत आहे. हा योग साधून केंद्राने मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.मराठी विद्यापीठाची घोषणाही होऊ द्यामराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारच्या अख्त्यारितील आहे. त्यामुळे त्याला विलंब होणे समजून घेता येईल. परंतु मराठी विद्यापीठाचा विषय तर पूर्णपणे राज्य शासनाच्या अधिकारातील आहे. महाराष्ट्रात मराठीची होणारी ही प्रतारणा थांबवून राज्य शासनाने यंदाच्या साहित्य संमेलनापूर्वी मराठी विद्यापीठ निर्मितीची घोषणा करावी, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर