Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:02 PM2019-10-02T13:02:17+5:302019-10-02T13:03:43+5:30

भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.

Barium support BJP again | Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

Next
ठळक मुद्देसुलेखा कुंभारे यांची घोषणाभाजपने पाच वर्षात विकास काम केलीचंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीमधूनच उमेदवारी देण्यात यावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. तसेच कामठी येथून चंद्रशेखर बावनकुळे यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही केली.
इंदु मिलच्या जागेवर भव्य स्मारक होणार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनच्या निवासस्थानाला स्मारकाचा दर्जा दिला, बुद्ध सर्किट निर्माण केले, डॉ आंबेडकर कन्वेंशन सेंटर दिल्ली येथे स्थापन केले, दीक्षाभूमीला मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला, आदी कामे भाजपने केली आहेत.
त्यामुळे बरिएम पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच
मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला आहे, तशी घोषणाही केली होती. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही. मी धम्माचे काम करणार आहे. कार्यकर्ते निवडणूक लढवतील. बावनकुळे यांनी कामठीसह संपूर्ण नागपुरात चांगले काम केले असून त्यांनाच कामठीतून उमेदवारी मिळावी मुख्यमंत्र्यांकडे देखील तशी मागणी केली असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.

Web Title: Barium support BJP again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.