शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

बाप्पा आले : पाऊस, फुलांच्या वर्षावात मोरयाचे घरोघरी आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:14 IST

आज अक्षरश: पाऊस, फुलांच्या वर्षावात अवघ्या भक्तांच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले. वाजंत्रीचा ‘तरतरतरार’, ढोल-ताशांचा ‘धनधनधणाट’, ध्वजपथकाची ‘ललकार’ अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गर्जनेत बाप्पा मोरया पुढचे दहा दिवस घरोघरी अन् सार्वजनिक ठिकाणी स्थापित झाले.

ठळक मुद्देदणादण वाजले ढोल अन् गणपती बाप्पा मोरयाची तूफान गर्जनाश्रीगणेशाच्या रंगात रंगले नागपूरचितारओळीसह इतर बाजारपेठा गणरायाच्या मिरवणुकीने फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज अक्षरश: पाऊस, फुलांच्या वर्षावात अवघ्या भक्तांच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले. वाजंत्रीचा ‘तरतरतरार’, ढोल-ताशांचा ‘धनधनधणाट’, ध्वजपथकाची ‘ललकार’ अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गर्जनेत बाप्पा मोरया पुढचे दहा दिवस घरोघरी अन् सार्वजनिक ठिकाणी स्थापित झाले. वक्रतुंड मोरयाच्या आगमानाची रया अशी काही होती की, संपूर्ण नागपूर केवळ आणि केवळ गणपती रंगात रंगून निघाले. 

पाऊस, फुलांचा वर्षावं आजं झाला, आला आला आला आजं गणराजं आला... अशा जल्लोषपूर्ण गाण्याच्या ओळीला साजेशे वातावरण आज नागपुरात अनुभवावयास मिळाले. सकाळपासूनच पावसाच्या रिपरिप सरींनी भगवंतांच्या आगमनासाठी वातावरणात पावित्र्य अन् सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. दुपारी जरा उघडिप मिळाल्याने, वेगवेगळ्या श्रीगणेश मंडळांचे स्वयंसेवक बाप्पाच्या स्वागतासाठी आवश्यक असलेल्या साजोसामानासह अपेक्षित स्थळी हजर झाले. विविध मंडळांच्या ओळखीला साजेशा गणवेशात ही स्वयंसेवक मंडळी तत्परतेने एकदंत मोरयाच्या आगमनासाठी सज्ज होती. महालातील चितारओळ म्हणजे, बाप्पाच्या मूर्तींचे माहेरघर आणि येथूनच शहरभरात आणि शहराबाहेरही मंडळांचे गणपती तयार होत असतात. त्यामुळे, अशा सर्वच गणेश मंडळे संपूर्ण तयारीनिशी हजर होते. अशीच स्थिती शहराच्या अन्य भागात विखुरलेल्या मूर्तिकारांकडे आणि त्या त्या भागात दिसून येत होती. ज्या रस्त्याने जावे तिकडे, तेथे जावे तेथे अन् जिकडे पाहावे तिकडे केवळ आणि केवळ गणपती बाप्पांच्या आगमनासाठी असलेला जल्लोष दिसावा, अशी शहराची स्थिती होती. श्रीगणेशाच्या भक्तिमय व्यवहारात संपूर्ण नागपूर गुंतले असल्याने, आज शहरातील सर्वच बाजारपेठा बंद होत्या. व्यापारी प्रतिष्ठाने बंद असली तरीही गर्दी कमी नव्हती. या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी मंडळांच्या स्वयंसेवकांसोबतच बघ्यांचीही गर्दी उसळली होती.मूर्तींना ताडपत्र्यांचे आवरण 
‘सेल्फी ट्रेण्ड’च्या काळात प्रत्येकाचे मोबाईल आगमनाचा हा आनंदी सोहळा कैद करण्यासाठी सरसावत होते. बाया-बापडे अन् वृद्धही या सार्वजनिक सोहळ्यासाठी अनाहुतपणे एकवटले होते आणि वाजंत्री, ढोल-ताशांच्या गजरात व बाप्पा मोरयाच्या गर्जनेत त्यांचे पाऊलही थिरकत होते. या जल्लोषाचा आनंद वरुणराजालाही आवरला नसावा म्हणून की काय दुपारपासून विश्रांतीस गेलेल्या पावसाचे संध्याकाळच्या सुमारास धडाक्यात आगमन झाले. मंडळांच्या स्वयंसेवकांसह इतर नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. मात्र, सकाळी कोसळलेल्या पाऊस सरींचा अंदाज घेऊन आधीच तयारी असल्याने, लागलीच मूर्तींना ताडपत्र्यांचे आवरण घातले गेले. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह जराही मावळला नाही आणि भर पावसात मिरवणूक सुरू होत्या.वाहतुकीची कोंडी 
मिरवणूक म्हटली की रहदारीची व्यवस्था काही काळ ढासळते. त्यात श्रीगणेशाच्या आगमनाच्या शेकडो मिरवणुका एकाच वेळी एकसाथ निघाल्याने, रहदारीची व्यवस्था पूर्णत: कोलमडल्याचे दिसून येत होते. चितारओळीमध्ये अशीच स्थिती होती. येथे आलेल्या सीताबर्डीवरील एका मंडळाच्या ड्रायव्हरला पोलीस कर्मचाऱ्याने श्रीमुखात भडकावल्याची घटनाही उघडकीस आली. विशेष म्हणजे, मंडळाचा गणपती ज्या ट्रॅक्टरवर स्वार होत होता, त्याच ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसोबत हा प्रकार घडला. कोणतीही अरेरावी न करता पोलीस कर्मचारी अशा तऱ्हेने वागत असतील.. तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल यावेळी नागरिकांकडून विचारला जात होता. चितोरओळीकडे जाणारे सभोवतालचे मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखून धरले होते. कोतवाली पोलीस स्टेशन, चिटणीस पार्क चौक, सीए रोड, अयाचित मंदिर असा संपूर्ण परिसर रहदारीसाठी थांबविण्यात आला होता. मात्र, मंडळांच्या गणपतींना जाण्यासाठी पोलिसांनी रस्ताच सोडला नव्हता. त्यामुळे विचारणा केली असता पोलिसांशी हुज्जतबाजीही सुरू होती. एका राजकीय नेत्यानेही याबाबत पोलिसांना ‘ही कसली व्यवस्था’ असा रोखठोक सवाल त्याचवेळी विचारला. ट्रॅफिकच्या या गैरसोयीमुळे अनेक मंडळांचे बाप्पा ठरल्या वेळी मंडळांमध्ये पोहोचू शकले नाही.चिमुकल्या गणपतींचा कौतुकसोहळा 
मोठ्या गणपतींच्या मिरवणुकीला उसळलेल्या जनसागरात घरगुती अर्थात चिमुकल्या गणपतींचे कौतुकही मोठ्या लडिवाळपणे केले जात होते. घरातील थोरा-मोठ्यांसह चिमुकली मंडळी विशेष हर्षाने लाडक्या बाप्पाला नेण्यास उत्सुक होती. बाप्पा माझ्याच हातात अगर डोक्यावर असावा, असा हट्ट करत असलेली मुलेही नजरेच पडत होती. मध्येच दुसऱ्याचा गणपती दिसल्यावर निरागसपणे हीच मुले ‘आमचा-तुमचा’ असे करत असल्याचेही दिसत होती.पावसामुळे मुहूर्त चुकलेआज पार्थिक गणपतीच्या स्थापनेसाठी दिवसभर अनुकूल वेळा होत्या. मात्र, ज्यांना उत्तम मुहूर्त बघून स्थापना करायची असते, त्यांचा मुहूर्त पावसाने चुकवला. ज्यांना सकाळी स्थापना करायची होती. त्यांनी रविवारीच बाप्पाची मूर्ती आणली होती. मात्र, ज्यांना संध्याकाळपर्यंतचा मुहूर्त साधायचा होता, त्यांना पावसाने अडथळा निर्माण केला. संध्याकाळी आलेल्या पावसाने भक्तांची मोठीच अव्यवस्था झाली. अनेकांच्या मूर्तींना पाणी लागले होते. मात्र, तशाही स्थितीत मूर्ती नेण्याचा पराक्रम भक्तांकडून होत होता. काहींनी जिथे सापडेल तिथे आडोसा घेत मूर्तीचे रक्षण केले. त्यामुळे, अनेकांच्या पार्थिव गणपतींची स्थापना उशिराने झाली.वाजंत्री, ढोल-ताशा, बॅण्ड अन् ध्वजपथके एकसाथ 
चितारओळीमध्ये विविध मंडळांचे गणपती असल्याने, मूर्ती नेण्यासाठी जवळपास सर्वच मंडळांनी एकच वेळ साधली होती. त्याचा सुरेख संगमही दिसून येत होता. प्रत्येक मंडळांनी ढोल-ताशा, वाजंत्री अन् बॅण्ड पथकाचे नियोजन केले होते. सोबतील ध्वजपथकेही असल्याने, या सर्वांचा एकसाथ नाद जोश भरत होता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर